आंधळ्या मुक्या बहिऱ्या सरकार पर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहचवु !

(कॉग्रेसची आढावा बैठकितून राम देवसरकरांचा हल्लाबोल ; स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसचा झेंडा लाऊ )
शेख मुजाहिद सह-संस्थापक
उमरखेड : शेतकऱ्यांच्या वर्ष भराची मेहनत अतिवृष्टी व पुरात वाहुन गेली. उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदनेची हाक, राहुल गांधी प्रमाणे रस्त्यावर उतरून,आंधळ्या मुक्या बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत भव्य मोर्चा काढून पोहोचवू, त्यांना पुरेपूर मदत मिळवून देण्याची जबाबदारी आता काँग्रेसच्या खांद्यावर पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर, घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
दर बैठकीचे अध्यक्ष तातू देशमुख, विधानसभा निरीक्षक चंद्रकात साठे , सचिन नाईक, नंदकिशोर अग्रवाल, दत्तराव शिंदे, शिवाजी देशमुख , गोपाल अग्रवाल, बाळासाहेब चंद्रे, महेंद्र कावळे, अनिल राठोड , प्रेमराव वानखेडे, शैलेश कोपरकर, सूर्यकांता दिंडाळकर, खाजाभाई कुरेशी, सुधाकर लाहेवार,अजय माहेश्वरी , विवेक मुडे, अंबादास धुळे, तालीम शेख आदि मंचावर उपस्थित होते. देवसरकर पुढे बोलताना म्हणाले, संवेदना बोथट झालेले सत्ताधारी सध्या धर्माच्या आणि जाती जातींमध्ये भांडणे लावून, जनमानसांना पेटवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला हाणून पाडण्याची ही जबाबदारी तुम्हा आम्हा काँग्रेस जणांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये, मोठ्या ताकतीने आपल्याला समोर जायचे आहे. विधानसभेतील 93 हजार मतांचा भरभक्कम पाठिंबा आपल्या पाठीशी असून, काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा लावायचा आहे. विधानसभेतील सर्वच पदाधिकाऱ्यांपासून बुथ लेवल पर्यंत सर्वांनाच कामाला लागण्याचे आव्हान यावेळी केले. एकंदरीत झालेल्या आढावा बैठकीतून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला होता. यावेळी विधानसभेतून शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.



