शैक्षणिक

तेजमल गांधी कृषी विद्यालयात 175 प्रयोगाची मांडणी करून उत्साहात विज्ञान प्रदर्शनी संपन्न

उमरखेड
श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचलित श्री तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव येथे भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनीचे उद्घाटन पंचायत समितीचे प्रतिनिधी साधन व्यक्ती श्री शिवाजी सावळे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही.एन. सादुडे सर प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक श्री एच आर खोकले समन्वयक श्री बि.डी गावंडे श्री अशोक शिरफुले हे होते तर परीक्षक म्हणून विज्ञान शिक्षक आनंद सोनटक्के, सुनिल वानखेडे, दत्तराव कदम,आनंद कांबळे, अरविंद माने हे होते.
वर्ग पाच ते सातच्या विद्यार्थ्यांनी 140 प्रयोग तर आठ ते दहाच्या विद्यार्थ्यांनी 35 प्रयोगाची मांडणी केली.
विद्यार्थ्यांमधील वास्तविक ज्ञान वृद्धिंगत करणे,संशोधन वृत्ती वाढवणे व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. 700 विध्यार्थ्यांनी या प्रयोगाची पाहणी केली.
श्री शादुडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी श्री ए.के. पवार सर ,खान सर, गाडेकर सर, शिरगूरवार मॅडम,विजय लंकलवाडसर , मोहेकर सर शिंदे सर, गरुडे सर, व शिंगणकर दादा, मारोतराव म्हैसकर इतर शिक्षक मंडळी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button