सामाजिक

आकांक्षा ॲपमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा बदल दिसून येईल डॉ. या .मा. राऊत

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
स्थानिक सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब तर्फे आकांक्षा ॲप मोफत देण्यात आले. या ॲपमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा बदल दिसून येईल असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. या.मा .राऊत यांनी केले रोटरी क्लबशी जवळपास 12 लाख लोक जोडले गेले आहेत. जगातील पोलिओ निर्मूलनाचे मोठे काम रोटरी क्लबच्या मानवी साखळीने केले आहे
समाजसेवा ,शैक्षणिक ,पर्यावरण या सर्व विभागांमध्ये रोटरी क्लब काम करते .यातूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ॲप मोफत देण्याचे कार्य आज रोटरी क्लब उमरखेड यांनी केले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे उमरखेड तालुका अध्यक्ष श्रीराम सारडा, डॉ. विशाल माने सचिव रोटरी क्लब उमरखेड ,डॉ. मंगेश नरवाडे प्रायोजक ,डॉ प्रा. अनिल काळबांडे प्रोजेक्ट डायरेक्टर ,डॉ. स्वप्निल गावंडे ,प्राचार्य प्रतिभा मेश्राम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिक्षणाशिवाय व कठोर मेहनती शिवाय पर्याय नाही. आज ब्रँडला महत्व आहे असे प्रतिपादन डॉ. प्रा. अनिल काळबांडे यांनी केले. त्यांनी डॉ. बाबासाहेबआंबेडकरांच्या जीवनातील कठोर मेहनतीचे व इतर काही उदाहरणे घेऊन विद्यार्थिनींना मंत्र मुग्ध केले.
महागावचे भूमिपुत्र असलेल्या डाॅ. मंगेश नरवाडे यांनी महागाव तालुक्यातील शाळांना देण्यात येणाऱ्या ॲपचा पूर्ण खर्च उचलला व समाजापुढे आपणही आपल्या जन्मभूमीला काही देणे लागतो याचे उदाहरण घालून दिले. ॲप मोफत मिळाले म्हणून त्याचा सदुपयोग करा असे आवाहन डॉ. मंगेश नरवाडे यांनी केली. यावेळी विद्यालयातील सुरेश कदम, गुणवंत शिवरकर, अशोक शिरगुरवार, परमेश्वर पाटेकर, दीपक चिंतले, प्रवीण पवार, वैभव जांभुळकर आदी उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव धात्रक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत कदम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button