शहर

ग्रा.प. माळवागत येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी…( गटविकास अधिकारी कदम कलम 39(1) अहवाल पाठवण्यास असमर्थ)दोषींवर कधी फौजदारी गुन्हे दाखल होणार?

महागांव, प्रतिनिधी संजय नागरगोजे

ग्रा.प. माळवागत येथील सरपंच सौ.चंचल विनोद जाधव यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले. परंतु गटविकास अधिकारी कदम यांनी त्या प्रकरणात मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला नाही त्यामुळे कार्यवाही अद्याप प्रस्तावित आहे.माळवागत येथील ग्रा प.मध्ये अनियमितता झाल्याची तक्रार झाल्याने चौकशी अहवाल प्राप्त झाला. या नंतरही आज पावेतो संबंधितावर कार्यवाही झाली नाही. दोषी असणाऱ्या पदाधिकारी कर्मचाऱ्यावर कार्यवाही व्हावी, या साठी माळवागत येथील सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज चव्हाण यांनी चार महिन्यापूर्वी जिल्हा परिषद यवतमाळ येथे उपोषण केले.
महागाव पंचायत समिती मार्फत वापर करणे दोन वेळा चौकशी करण्यात आली. त्या चौकशी अहवालात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. त्यावरून तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी पुन्ह उमरखेड तालुक्यातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठित केली. त्या समितीमध्ये गटविकास अधिकारी उमरखेड चौकशी प्रमुख तसेच शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड सदस्य व विस्तार अधिकारी पंचायत समिती उमरखेड सदस्य या कमिटीने ग्रा.प. माळवागत येथे जाऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान प्रचंड प्रमाणात अनियमितता झाल्याचे सिद्ध झाले. समितीकडून चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या मुळे माळवागत ग्रा.प.च्या अनियमिततेत दोषी आढळणाऱ्यावर कार्यवाही करणे अपेक्षित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांनी सरपंच चंचल विनोद जाधव हे दोषी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याकरता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार प्रस्ताव सात दिवसाच्या आत गटविकास अधिकारी कदम साहेब यांनी पाठवायला पाहिजे होता. असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र असताना परंतु राजकीय दबाव पोटी त्यांनी हे प्रकरण दडवून ठेवल्यामुळे त्यामुळे तक्रार करता यांनी तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले त्यामुळे नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी कदम साहेब वरिष्ठांचे आदेशाचे पालन करतात का ? या याकडे लक्ष लागले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button