शैक्षणिक

साकळे विद्यालय उमरखेड येथे पालक सभा संपन्नपालक शिक्षक यांच्यात मनमोकळा संवाद

शेख मुजाहिद ससंपादक

१८सप्टेंबर २०२५
उमरखेड :-विद्यादानाचे अविरत कार्य करून संस्कारक्षम विद्यार्थ्यांची साखळी निर्माण करून शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या साकळे विद्यालयात आज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेली पालक सभा उत्साहात पार पडली.
पालक प्रतिनिधी नवीन जोशी यांनी अध्यक्षस्थान भूषविले सर्वप्रथम श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष अं.गो.साकळे सर, माजी मुख्याध्यापक ए.के. पांडे सर, भारत कुळकर्णी सर, दीपक देशमुख हे मंचावर उपस्थित होते. शालेय शिक्षणासोबतच प्रत्येक क्षेत्रामध्ये शाळेचा वाढता आलेख आपल्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक पाणबुडे सरांनी पालकांना समोर मांडला.येत्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षिका श्रीमती अकिनवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबतीत आणि शालेय सुधारण्याकरिता पालकांनी आम्हास सुचवावे असे प्रशांत पांडे सरांनी म्हटले यावेळी उपस्थित पालकांनी शालेय प्रगती बाबत समाधान व्यक्त केले तर

शाळेमध्ये डिजिटल बोर्ड व्हावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या संपर्कात राहणे सोयीचे होईल, त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक सुप्त गुण लपलेला असतो आणि तो गुण ओळखण्याची निसर्ग दत्त शक्ती शिक्षकांमध्ये असते तेव्हा विद्यार्थ्यांचा विकास साधण्याच्या दृष्टीने त्यांच्या सुप्त गुणांना वाव सदर शाळेत दिला जातो असे प्रशांत पांडे सरांनी सांगितले याबाबतीत उपस्थित पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त करून शिक्षक वृंदांचे आभार मानले. सभेच्या वेळी पालक आणि शिक्षक यांच्यात मनमोकळा संवाद साधला गेल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षका इतकेच पालकांनी लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षक वृंदावन तर्फे करण्यात आले. उपस्थित पालकांमधून बहुतांश पालक हे या शाळेचे माजी विद्यार्थी होते सभेचे वेळी शिक्षक वृंदा तर्फे प्रत्येक पालकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आल्याने पालक वर्ग भारावून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन प्रशांत पांडे सर यांनी केले तर महाराज सर यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button