Uncategorized

माळेगाव – माळकिनी येथील शिप नदीवरील पुलाचे अर्धवट बांधकाम ! ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी

{ येणाऱ्या जिल्हा परिषद ,व प .स.मध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते उदयास येणार!)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात माळेगाव माळकिनी येथील शिप नदीवरील फुलाचे अर्धवट बांधकाम झाले आहे.या कामाला पाच वर्षे होऊन गेले कामाची मुदत संपून बऱ्याच वर्षाचा कालावधी झाला.परंतु बांधकाम अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळे या फुलाचे अर्धवट काम असणाऱ्या ठेकेदाराला पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे, नोटीस देखील देण्यात आली होती .परंतु त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्या ठेकेदाराकडे असलेले सर्व काम बांधकाम विभागाने न थांबवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .याबाबत दैनिक महासागर वृत्तपत्रात यापूर्वी बातमी प्रसिद्ध झाली होती.त्याची दखल घेऊन आमदार किशनराव वानखेडे यांनी या पुलाची पाहणी करून लक्षवेधी करण्याचे आश्वासन दिले होते.व त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्या जाईल असे आमच्या प्रतिनिधी जवळ बातमी आल्यावर प्रतिक्रिया दिली होती .दोन दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे शिप नदीला महापूर आला होता .त्यावेळेस शाळेच्या विद्यार्थ्यांना कित्येक वेळ थांबावे लागले अखेर गावातील सामाजिक कार्यकर्ते नागरिकांच्या सेवेत असणारे कार्यकर्ते यांनी काळीमार्ग जाऊन कुजर गाडीने विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरू सुखरूप पोहोचवले या अर्धवट पुलामुळे नेतेमंडळी बघायची भूमिका घेतात जिल्हा परिषद, व प. स. चे नेते या कामाचा पाठपुरावा देखील करत नाही मतापुरते गावातील नागरिकांना आश्वासने देऊन विकास कामाचा गाजावाजा व भूमिपूजन करून अर्धवट काम ठेवल्याचे चित्र दिसत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य मंत्राच्या गाडीमध्ये बसून मागेपुढे करतात परंतु भूमिपूजन झालेली कामे अर्धवट आहे. हे त्यांना दिसत नाही ही मोठी शोकांतिका आहे .त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व प. स. निवडणुकीत माळेगाव माळकिनी गुंज येथील नागरिक नवीन होतकरू कार्यकर्ता शोधण्याच्या तयारीत दिसत आहे .त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचे राजकारण नामोनिशान होण्याच्या मार्गावर दिसत आहे . अशा अर्धवट कामाचा वाजा गाजा करत नवीन युवा कार्यकर्ते नागरिकांना जागृत करून जोमाने कामाला लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नवीन सदस्य निवडून येणार हे निश्चित . अशी चर्चा गुंज गटामध्ये मध्ये सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button