प्लांटच्या उभारणी दरम्यान क्षतीग्रस्त झालेला ढाणकी गांजेगाव रस्ता स्नेहा गोल्ड करील का रीमोल्ड

शेख मुजाहिद सह-संस्थापक मो.7798306192
उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते गांजेगाव या रोडवर उभारणी होत असलेला स्नेहा गोल्ड प्लांट हा भविष्याच्या दृष्टीने चांगला आहे यात शंका नाही परंतु याच स्नेहा गोल्ड प्लांटच्या उभारणी दरम्यान ढाणकी ते गांजेगाव रस्ता जो की प्रधानमंत्री सडक योजना अंतर्गत गेल्या एक ते दीड वर्षांपूर्वी झालेला रस्ता स्नेहा गोल्ड प्लांट च्या कामाकरिता येणाऱ्या अवजड वाहनाने अक्षरशः क्षतीग्रस्त झालेला आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, आज रोजी प्रतिनिधीने स्नेहा गोल्ड प्लांटला भेट दिली असता तेथील सुरक्षा कर्मचारी तसेच मॅनेजर यांची वागणूक ही माणुसकी साधर्म्य असणारी नव्हती. ढाणकी वरून गांजेगाव जात असताना प्रवाशांना अक्षरशः कसरत करत जावे लागते. सदर रस्ता हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला असून
सदर रस्ता अवजड म्हणजे १०:०० टन प्रति एक्सेस पेक्षा अधिक वजनांच्या वाहनाकरिता प्रतिबंधित आहे हा रस्ता आपण सर्व गावकऱ्यांची संपत्ती आहे तरी रस्त्यावर अवजड वाहतूक होण्यापासून वाचवा असे फलक कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यवतमाळ यांनी लावले असून सुद्धा स्नेहा गोल्ड प्लांटच्या उभारणी करता मोठमोठ्या मशीन, मोठमोठे हायवा, अवजड वाहने या रस्त्याने येणे जाणे करीत असतात त्यामुळे हा रस्ता अल्पावधीतच अतिशय ग्रस्त झाला असल्याचे नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सदर रस्त्याने मोठमोठाली अवजड वाहनांची वाहतूक करण्याची कोणत्या विभागाने स्नेहा गोल्ड प्लांट ला परवानगी दिली? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत असून सदरील प्लांटच्या अवजड वाहनांच्या होत असणाऱ्या वाहतुकीमुळे या रस्त्याची झालेली झीज कोण म्हणून भरून काढेल कारण ग्रामीण भागात कोणतेही विकासाची कामे करताना अनेक दिव्य बघावे लागते कशातरी प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत तयार झालेला रस्ता अल्पावधीतच उखडून गेला आहे या रस्त्याची दुरुस्ती स्नेहा गोल्ड प्लांट करून करण्यात येईल का? या प्रकारचे बरेच प्रश्न उपस्थित नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.



