Uncategorized

खडका येथे उडान पुलावर पुन्हा रोड रॉबरी

महागाव ता. प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात खडका येथे उड्डाण पुलावर दोन वर्षांपूर्वी किराणा व्यापारी अनिल शर्मा यांना सायंकाळी पाच वाजता लुटले होते. व अति गंभीर वार करून घायाळ केले होते. ही घटना ताजी असताना ऐन सणासुदीच्या वसुबारस रोजी आज 17-10-25 रोजी संध्याकाळी दहा वाजता सुम्हारास हिवरा येथील मेडिकलचे संचालक दुकान बंद करून वसंतराव टेकाळे आपल्या गावाकडे येत असताना त्यांना पुलावर अडून यांच्याकडून 45000 रुपये कॅश लुटून आरोपी पोखरी मार्गे फरार झाले .घटनेची माहिती होताच महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन चौकशी चक्र फिरवले . हायवे रोडला संध्याकाळी पुलावर टवाळखोर नेहमी नशा करत बसलेली असतात. त्यांना साधी विचारतो सुद्धा कोणी करत नाही. घटनेची तक्रार महागाव पोलीस स्टेशनला येऊन देणार असे कळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button