निवडणुका पारदर्शी होण्यासाठी बॅलेट पेपरवर घ्या… संध्या रणवीर

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
महागांव दि 13 ऑगस्ट निवडणुका पारदर्शक करण्यासाठी व प्रगल्भ लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ईव्हिएम मशीन ऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर घेण्याबाबत महामहीम राष्ट्रपती यांना संध्या संदेश रणवीर तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांनी तहसीलदार महागांव मार्फत निवेदन देऊन मतदार हितार्थ मागणी केली आहे.
ईव्हिएम मशीन मधुन दिलेली मते ही संबंधित उमेदवारास दिली किंवा नाही? याबाबतीत मतदाराच्या मनात शंका-कुशंका असल्याने सुदृढ लोकशाही या संकल्पनेला तडा निर्माण होत आहे.

निवडणुका ह्या पारदर्शक वा नि: पक्षपाती व्हाव्यात वा प्रगल्भ लोकशाहीची विश्वासाहर्ता टिकून राहावी यासाठी ईव्हिएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात कारण ईव्हिएम मशीन वर मतदाराचा मागील निवडणुकाचा संदर्भ पाहता संशय बळावला असून त्याकरिता निवडणूका पारदर्शी व्हाव्यात यासाठी यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी जनहितार्थ मागणी संध्या रणवीर यांनी महामहीम राष्ट्रपती यांना केली आहे.
निवेदन नायब तहसीलदार निवडणूक व्ही व्ही पवार यांनी स्वीकारले यावेळी नारायण शिरभीरे हे निवेदन देता वेळी उपस्थित होते



