वाकान येथील अंगणवाडी केंद्रात सलग दुसऱ्या दिवशीही ध्वजारोहण!

महागांव: प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील वाकान येथील अंगणवाडी सेवा केंद्र येथे दिनांक १३ आगष्ट पासुन ध्वजारोहण करण्यात आले असुन सलग दुसऱ्या दिवशी दिनांक १४ आगष्ट रोजीहि अंगणवाडी केंद्रात ध्वजारोहण करण्यात आले केंद्र शासनाने व राज्य शासनाने दिनांक १३ आगष्ट ते १५ आगष्ट पर्यंत सतत तीन दिवस राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत व अंगणवाडी केंद्र येथे ध्वजारोहण करण्याचे आदेशीत केल्याने आदेशाचे पालन करुन वाकान येथील अंगणवाडी सेवा केंद्र येथे १३ आगष्ट पासुन ध्वजारोहण करण्यात येत आहे व आज १४ आगष्ट रोजी अंगणवाडी केंद्रावर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सरपंच, आश्वजीत भगत, उपसरपंच,परेश राठोड, ग्रां पं सदस्य, नामदेव जाधव श्री परसराम पवार,अंगणवाडी सेविका सौ अल्काताई, आशाताई मदतनीस,ग्रा.प आॅपरेटर रामकुमार,व भावी ग्रा.प सदस्य गजानन जाधव आदी उपस्थित होते



