दत्तात्रेय संस्थान आंबाळी येथे दर्शनासाठी आलेली भाविकांची क्रूझर १०० फुट दरीत कोसळली, तिघेही सुखरूप बचावले

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दत्तात्रेय प्रभु संस्थान, आंबाळी येथे दर्शनासाठी आलेले भाविक एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. क्रूझर गाडी (क्रमांक MH-22 U 7613) दरीत सुमारे १०० फूट खोल कोसळली. गाडीमध्ये तीन जण प्रवास करत होते अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे .
दरीत कोसळताना गाडीने दोन ते तीन झाडे उडवत खाली झेप घेतली, मात्र दैव बलवत्तर म्हणून की काय, या भीषण अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. तिघेही प्रवासी सुखरूप असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
अपघात घडल्यानंतर काही वेळातच मदतकार्य सुरू झाले. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. गाडीच्या वेगामुळे आणि रस्त्यालगत संरक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी हा प्रसंग घडला, मात्र जीवितहानी झाली नाही, हेच सर्वांच्या नशिबातलं मोठं भाग्य मानलं जात आहे. अपघातापासून बचावलेल्या भाविकांची नावे मात्र वृत्त लिहीपर्यन्त कळू शकली नाही .



