Uncategorized

गुरुपौर्णिमेनिमित्त शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

उमरखेड :- गुरुपौर्णिमेनिमित्त श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोफाळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे बालरोग तज्ञ डॉक्टर श्रीराम रावते व स्त्रीरोग तज्ञ अर्चनाताई श्रीराम रावते यांच्यातर्फे वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी शिलार हे होते तर प्रमुख पाहुणे सुरेश सुरोशे,माणिक कांबळे, प्रवीण सूर्यवंशी संतोष शिंदे हे होते.
माणसाला जन्मापासून ते आत्तापर्यंत अनेक गुरु भेटत आलेत त्यातील प्रथम गुरू म्हणजे आई-वडील कुटुंब आणि भोवतालचे वातावरण खऱ्या अर्थाने माणसाची जडणघडण ही त्याच्या परिवारातच होत असते तिथे त्याला सुसंस्काराचे बाळकडू मिळते. आज आपण तंत्र दिनाच्या युगात असतो तरी गुरुच्या मार्गदर्शन शिवाय पर्याय नाही प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून ज्ञानग्रहण केल्याशिवाय ते घडी उतरत नाही. त्यामुळे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ह्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत आहे आणि यामध्ये डॉ. श्रीराम रावते. डॉ. अर्चना रावते यांनी हे साहित्य सतोष शिन्दे यांच्या सहकार्यातून त्यांनी दिल्यामुळे त्यांचे आभार विद्यालयाच्या वतीने प्रवीण सूर्यवंशी यांनी मांडले या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हजर होते
=-====================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button