उमरखेड उपजिल्हा रुग्णालयाची कोट्यावधी ची नवीन इमारतमात्र गरोदर महिलांची प्रसुती जिर्ण इमारतीतच

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड प्रतिनिधी आरोग्य विभागाने शहरी व तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळावा यासाठी 1960 ला तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते राजाराम प्रभाजी उत्तरवार उपजिल्हा रुग्णाची सुरुवात झाली होती आज या रुग्णालयाला कोट्यावधी रुपये खर्चून नवीन इमारत मिळाली परंतु रुग्णांच्या समस्या ह्या मात्र कायमच राहिले आहेत नविन इमारती मध्ये राहीलेल्या अपूर्ण कामा मुळे गरोदर महिलांची प्रसुती मात्र जुन्या जीर्ण इमारतीतच होत आहे या रुग्णालयात दररोज उपचारासाठी 600 पेक्षा जास्त रुग्ण येत असतात
उमरखेड तालुक्याची लोकसंख्या दोन लाख 22 हजार आहे त्यामध्ये उमरखेड शहराची लोकसंख्या 55 हजार 670 इतकी आहे शहर आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मिळावी यासाठी उमरखेड शहरात राजाराम प्रभाजी उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती ६५ वर्षांपूर्वी झाली होती यामध्ये उमरखेड तालुक्यातील मुळावा ढाणकी थेरडी कोरटा विडूळ सोनदाबी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 36 उपकेंद्र येतात या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रेफर केलेले रुग्ण हे उमरखेड येथे उपजिल्हा रुग्णालयात येतात इथे उपचारासाठी येतात .या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकूण 52 मंजूर पद आहेत त्यापैक त्यापैकी वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी हे फक्त 36 आहेत 16 इतर कर्मचारी हे पद रिक्त आहेत त्यातील बहुतांश वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे रुग्णांना तातडींना आवश्यक रुग्ण सेवा मिळण्यास विलंब होतो परिणामी सर्व सोयीने युक्त असलेल्या या रुग्णालयातील समस्येमध्ये वाढ होत आहे जे वैद्यकीय अधिकारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजवतात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी व कर्मचाऱ्यासाठी असलेली निवासस्थानी अतिशय जीर्ण झालेली आहेत याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी वरिष्ठांना सुद्धा कळविले आहे परंतु ही निवासस्थानी अध्यापही दुर्लक्षित आहेत
॥चौकट ॥
उमरखेड तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत या प्राथमिक आरोग्य केंद्रातून बहुतांश गरोदर महिलांना प्रसूतीसाठी उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात पाठविले जाते त्याचप्रमाणे उमरखेड शहरातील दारिद्र रेषेखालील आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिला उपजिल्हा रुग्णालयात गरोदरपणात तपासण्यासाठी येतात या रुग्णालयात महिन्याकाठी 50 ते 60 महिलांचे बाळंतपण होते परंतु नवीन इमारत झाली त्या इमारतीचे काम मोठ्या प्रमाणात अपूर्णच आहेत त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या गरोदर महिलांची प्रसुती ही रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्येच होते या जुन्या इमारती जीर्ण झालेले आहेत पावसाचे पाणी स्लॅबमधून टपकते इमारती च्या अजुबाच्या परिसरात अस्वच्छता अशा अवस्थेत प्रसूती झालेल्या महिलांना राहावे लागत आहे
॥कोट ॥
उमरखेड उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत झालेली आहे त्यामध्ये बाह्य रुग्णविभाग विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कक्ष हे आहेत परंतु दुसऱ्या मजल्यावरच अनेक काम अपूर्ण राहिलेले आहेत त्यामुळे जुन्या इमारतीमध्येच गरोदर महिलांची प्रसूती करावी लागत आहे तसेच रिक्त असलले पदे भरण्यात यावे या बाबत वरिष्ठाकडे पाठपुरावा केला आहे
डॉ किशोर कपाळे
वैधकीय अधिक्षक उमरखेड
॥दररोज येतात ६०० च्या वर रुग्ण ॥
राजाराम प्रभाजी उत्तरवार या उपजिल्हा रुग्णालयामध्ये विविध आजारावर उपचार घेण्यासाठी दररोज 600 ते 700 रुग्ण येत असतात त्यांची तितकी नोंदही होते एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे रुग्ण येत असताना पाहिजे त्या प्रमाणात रुग्णांना सुविधा मिळत नाही या सर्व गंभीर प्रकाराकडे प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत अशी ओरड रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आहे



