माणकेश्वर तळ्यामध्ये अवैध्य मुरूम उपसा चालू महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

( माणकेश्वर खंड चे संबंधित तलाठी देवाण-घेवाण करून आहे की काय? )
( तलाठ्यांना माहिती विचारल्यास त्यांनी सांगितले की मुरमाची रॉयल्टी देण्यात आली व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्यास त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगितले तर यामध्ये सत्य काय ? )
मुख्य संपादक मो.9021233696
ब्राह्मणगावच्या बाजूला माणकेश्वर हद्दीमध्ये हजारो ब्रास मुरूम उपसा चालू असून संबंधित विभागाकडे वारंवार सूचना देऊन याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कारण आर्थिक देवाणघेवाण करून मुरूम चालू आहे असे वाटत आहे कारण जर एखाद्या अधिकाऱ्याला माहिती पोहोचून सुद्धा संबंधित महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी याकडे कानाडोळा करत आहे यावर जनतेचे म्हणणं आहे की हे अवैध्य मुरूम तलाठ्यांच्या मर्जीने चालू आहे कारण यावर जर संबंधित तलाठ्यांची वाचक असती तर हे अवैद्य मुरूम उपसा झालाच नसता याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा वाटतो की महसूल चे कर्मचारी तथा संबंधित तलाठी व वरिष्ठ अधिकारी आर्थिक घेवान देवान तर करून गुपचूप नाही ना ?