Uncategorized

बाळदी तांडा येथील नालीचे काम निकृष्ट दर्जाचे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बाळदी या गावात तांडा वस्तीमधील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील नालीचे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.
सदर नाली ग्रामपंचायत मध्ये प्रशासक असताना झालेली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आपली चांगलीच पोळी भाजून घेतलेली दिसते. म्हणुन त्या नालीची वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. नाली झाली तेव्हापासून दहा दिवसाच्या आतच त्या नालीचा बांबू फुटला गेला. तो बांबू अतिशय लहान साईजचा टाकण्यात आला होता.तेव्हा तेथील नागरिकांनी तोंडी सांगितले असता काही दिवसातच ते बांबूच काम करून देतो असे आश्वासन ग्रामसेवक यांनी दिले होते परंतु अध्याप काही महिने ओलाथुन सुद्धा अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही.त्याच रस्त्याने शाळेतील विद्यार्थी पण येत असतात आणि काही दिवसातच शाळा सुरू होत आहे त्याचा त्रास विद्यार्थ्यांना व त्या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागणार आहे त्यासाठी लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात यावी अशी मागणी तेथील नागरिक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!