मुडाणा येथे देशी विदेशी दारू विक्री त्यावर कारवाई महागाव शहरात देशी दारू विक्रेत्यावर कारवाई होणार का?महागाव येथील देशी दारूचे दुकान रद्द करण्याची मागणी

.
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
, महागाव तालुक्यात मुडाणा येथे अवैध देशी विदेशी बऱ्याच दिवसापासून खुलेआम विक्री सुरू होती त्यामुळे गावामध्ये झगड्याचे प्रमाण वाढले होते कायदा व सुव्यवस्था प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता त्यामुळे महागाव चे ठाणेदार धनराज निळ बीड जमादार गजाखेड ऐडकर, पीएसआय सागर अन्नमवार,कैलास मोखाडे सुनील जाधव, गजानन मस्के यांनी अवैध देशी विदेशी दारू विकणारे आरोपी विठ्ठल किसन राठोड ,अमोल दत्ता जाधव भारत पाईकराव, मोहन आडे, याच्यावर कारवाई करून दारू जप्त केली व त्यांच्या वर गुन्हे दाखल झाले परंतु महागाव शहरात अवैध देशी दारूचे दुकान लागले आहे.राजरोसपणे खुलेआम विक्री करत आहे परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही ही मोठी शोकांतिका आहे.शहरांमध्ये अवैध देशी दारूचे दुकान बंद करून कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहे महागाव येथील देशी दारूचे दुकान नियमाने दहा वाजता उघडायला पाहिजे परंतु सहा वाजता उघडून नियमाचे उल्लंघन करत असल्यामुळे त्यांचे देशी दारूचे परवाना रद्द करण्यासाठी अहवाल दारूबंदी अधिकारी यांच्याकडे पाठवावा 18 वर्षे वयोगटातील मुलांना देशी दारूच्या पेट्या खुल्या विक्री करतो त्यामुळे देशी दारूचा परवाना नियमबाह्य चालवत असल्यामुळे रद्द करण्याची मागणी महागाव वार्डातील महिलांनी केली आहे.