काळी दौलत येथे अवैध देशी दारू तस्करी करणाऱ्या वर एचडीपीओ पथकाची कारवाई.

महागाव शहरामध्ये देशी दारूचे 20 अवैध काउंटर बंद होतील का ?देशी दुकानाचे लायसन रद्द करण्याची मागणी
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात अवैधरित्या देशी विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या दोन दुचाकी चालकावर उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पथकाने धडक कारवाई करून एक लाख बत्तीस हजार रुपये 725 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई गुरुवारी बाजाराच्या दिवशी 12 जून 2025 रोजी पुसद नांदेड मार्गावर करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पथक पुसद यांना गोपनीय माहिती मिळाली की पुसद ते नांदेड मार्गावर दोन दुचाकी वरून देशी विदेशी दारूची वाहतूक करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून दोन दुचाकी सह एक मोबाईल व अवैध दारू असा एकूण 1 लाख 32 हजार 725 मुद्देमाल जप्त केला व दोन आरोपींना अटक केली आहे. महागाव शहरांमध्ये खुलेआम देशी दारू पानपट्टीवर तहसील समोर बाजारात वार्डा वार्डामध्ये खुल्या दुकान लागली आहे. महागाव येथील देशी दारूचे दुकान त्यांना पेट्याने देशी दारू सप्लाय करतो त्या देशी दुकानावर दारूबंदी अधिकाऱ्याने कारवाई करून दुकान लायसन रद्द करावे अश्या मागणीला जोर धरत आहे 18 वर्षे वयोगटातील मुलांना महागाव येथील देशी दारूचे दुकान खुले खुलेआम विकताना दिसत असून तसेच सकाळी सहा वाजल्यापासून देशी दारूच्या पेट्या त्या दुकानातून सप्लाय होतो. नियमानुसार ते दुकान दहा वाजता उघडायला पाहिजे परंतु नियम धाब्यावर बसून महागाव येथील देशी दारूचे दुकान अधिकाराच्या नाकावर टिचून अवैध व्यवसाय करत असल्याच दिसत असताना त्या देशी दारूच्या दुकानावर ठाणेदार बीट जमादार ,दारूबंदी अधिकारी व एलसीबी पथक तसेच उपविभागीय अधिकारी हे कारवाई करतील का? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.