महागाव युनियन बँकेच्या शाखेतून ग्राहकाचे 50 हजार रु चोरीब्लेडने कापडी पिशवीवर चिरा मारून रक्कम उडवली

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव येथील युनियन बँक शाखेत ग्राहकाने कापडी पिशवी ठेवलेली रक्कम अज्ञातांनी चोराने अत्यंत सीताफिने चोरून नेली आज शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली पेढी (इजारा )येथे रहिवासी शेख गफार शेख रहेमान हे त्यांच्या वृद्ध आई पुतली बी शेख रहमान यांच्यासह बँकेत आल्या होत्या त्यांनी बँकेतून 90 हजार रुपये रोख रक्कम विड्रॉल केली होती .काही क्षणात अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपये कापडी पिशवीतून ब्लेडच्या साह्याने कट करून लंपास केले चा प्रकार उघडकीस आला शेख गप्पार यांनी बँक व्यवस्थापकाला चोरीची माहिती दिली त्यांनी त्वरित महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये तीन अज्ञात महिला आणि एक छोटा मुलगा घटनेनंतर जाताना दिसतो या लोकांवर संशय व्यक्त केला जात आहे.आज शुक्रवार महागाव चा बाजाराचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी राहते गर्दीचा फायदा घेऊन बाजारामध्ये अनेक मोबाईल चोरी गेले आहे .तसेच शेतकऱ्यांचे बी बियाणे लागवड साठी बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे विड्रॉल करून कास्तकार नेत आहे याचा फायदा चोरी करणारे चोर घेत असून लवकरात लवकर चोरी करणारे टीम ताब्यात घेऊ असे महागावचे ठाणेदार निळे यांनी आश्वासन दिले आहे.