Uncategorized

हुंडा घेणाऱ्यांच्या लग्नाला हजेरी नाही अविनाश चंद्रवंशी यांचा ठाम विरोध.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले असताना, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण नेतृत्व अविनाश चंद्रवंशी यांनी हुंडा प्रथेच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. मी स्वतः हुंडा घेणार नाही आणि हुंडा घेणाऱ्यांच्या किंवा देणाऱ्यांच्या लग्नाला हजेरी लावणार नाही, असे त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर केले. ही केवळ वैयक्तिक भूमिका नसून सामाजिक परिवर्तनाची सुरुवात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हुंडा ही एक अशा प्रकारची प्रथा आहे जी केवळ मुलींच्या स्वप्नांची राख करत नाही, तर अनेक वडिलांना कर्जबाजारी करते, संपूर्ण कुटुंबांवर ताण आणते आणि काही वेळा आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयांपर्यंत नेत असते. वैष्णवी हगवणेचा बळी हे त्याचे विदारक उदाहरण आहे. कोट्यवधी रुपयांचा हुंडा दिला गेला तरी तिचं आयुष्य वाचू शकलं नाही. ही सामाजिक वेदना आणि अन्याय लक्षात घेता, अशा विवाहांना माझी उपस्थिती म्हणजे त्या अन्यायाला पाठिंबा ठरेल, असं त्यांनी नमूद केलं. याचबरोबर, त्यांनी बालविवाह आणि इच्छेविरुद्ध लावण्यात येणाऱ्या विवाहालाही ठाम विरोध दर्शवला आहे. मुलींच्या आत्मसन्मानापेक्षा मोठं कोणतंही नातं असू शकत नाही, असं ठाम विधान त्यांनी केलं.
अविनाश चंद्रवंशी यांची ही भूमिका समाजात नवा विचार निर्माण करणारी आहे. त्यांचा हा निर्धार अनेक तरुणांना प्रेरणा देणारा ठरत असून, हुंडा-मुक्त, समतामूल्यांनी भरलेला समाज घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!