Uncategorized

जलजिवनच्या कामाकरीता दिली अंदाजपत्रका पेक्षा जास्त रक्कम(पाणी पुरवठा उपविभागीय कुमठे व शाखा अभियंत्यांकरून सोनी यांच्याकडून वसुल केल्या जाणार अडीच लाख रुपये)


महागाव तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे


महागाव तालुक्यात करंजखेड, पोहंडूळ ,आमणी, पोखरी ,कासाळबेळ, मोहदी, वेणी, तसेच संपूर्ण तालुक्यात जल जीवन योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे .याला जबाबदार पाणीपुरवठा उपविभागीय अधिकारी कुमठे व शाखा अभियंता सोनी हे जबाबदार आहे .कामाची चौकशी होणे गरजेचे आहे . जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महागाव तालुक्यातील जल जीवन कामाची चौकशी करणे गरजेचे झाले आहे. जलजिवन योजनेच्या कामाला अंदाज पत्रकाप्रमाणे देयक देणे गरजेचे असताना पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता,शाखा अभियंता यांनी कंत्राटदाराशी हित संबंध साधुन अडीच लाखांच्या वर रक्कम ज्यादा दिल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाल्याने या दोन्ही अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली ज्यादा रक्कम वसुल करण्याचे आदेश जि. प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
महागाव तालुक्यातील अनंतवाडी ग्राम पंचायत अंतर्गत अनंतवाडी व आनंदनगर येथे जलजीवन योजनेच्या माध्यमातून नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन चे काम करण्यात आले होते. सदर काम अंदाज पत्रकाला बगल देत अधिकारी व कंत्राटदार मनमानी पद्धतीने करीत असल्याचा आरोप करीत याची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देविदास राठोड, सिमा वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जि. प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.परंतु कारवाई होत नसल्याने त्यांनी अनेक वेळा आंदोलने केली त्याची दखल जि. प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार सदर कामाची चौकशी समितीने केली असता त्यांना त्यामध्ये अंदाजपत्रक व मोजमाप पुस्तिकेवर नोंदविण्यात आलेल्या मुल्यांकन व समितीने केलेले मुल्यांकन यामध्ये बरीच तफावत आढुळन आली. यामध्ये आनंदनगर येथील कामावर ७७६१७रू व अनंतवाडी येथील कामावर १६०५७५रू ज्यादा खर्च दाखविण्यात आल्याचा अहवाल समितीने मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला त्यानुसार जि.प.सिईओं मंदार पत्की यांनी या कामासाठी या अहवालाचे अवलोकन करून संबंधित कामाची तांत्रिक बाबींची पडताळणी व पाहणी करून मूल्यमापन करण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा महागाव यांची असताना त्यांनी त्यामध्ये कुचराई केली,तसेच नवीन मुल्यांकणाचा विचार करून ज्यादा देण्यात आलेली २३८३७४रुपयांची रक्कम तत्कालीन उपविभागीय अभियंता एम. एच.कुमठे व शाखा अभियंता सौरभ सोनी यांच्याकडून प्रत्येकी ११९१८७रु वसुल करून घेण्याचे आदेश दिले आहे. सिईओं चा हा निर्णय स्वागतार्ह असुन भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना धडकी भरविणारा आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जलजीवन योजने अंतर्गत करण्यात आलेल्या महागाव तालुक्यातील सर्वच कामांची चौकशी केल्यास या उपविभागीय अभियंता कुमठे व शाखा अभियंता सोनी यांचे काळे कारनामे उघड झाल्याशिवाय राहणार नाही. करंजखेड ,कासार बेळ पोहंडूळ , पोखरी, मोहदी ,आमणी, येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला जल जीवन कामाचा बट्ट्याबोळ झाला घरोघरी पाणी पोचलेच नाही पाण्यापासून आजही नागरिक वंचित आहे .जलजीवन चे पाणी कुठे मुरले. चौकशी होणे गरजेचे आहे.

चौकट

अजुन रक्कम भरली नाही.
महागाव तालुक्यातील अनंतवाडी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या अनंतवाडी व आनंदनगर गावांमध्ये जलजिवनच्या कामावर ज्यादा रक्कम दिल्याचे उघड झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ज्यादा देण्यात आलेली रक्कम संबंधित उपविभागीय अभियंता कुमठे व शाखा अभियंता सोनी यांच्याकडून वसुल करण्याचे आदेश दोन महिन्या पुर्वी दिले आहेत.परंतु या दोन्ही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत पैसे जमा केले नाही त्यामुळे त्यांना अजुन एकदा नोटीस पाठविली जाणार असुन त्यांनी पैसे न भरल्यास तसा अहवाल सिईओं जि. प.यवतमाळ यांच्याकडे पाठविला जाईल.त्यावर कोणती कारवाई करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार सिईओंचा आहे.
:- एम. पि.काळबांडे(कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जि.प. यवतमाळ)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!