महागाव तालुक्यातील काळी दौलत खान पुसद वनपरिक्षेत्रातील कासोळा येथे ओसाड वनाचे पुनर्वणीकरन कार्यक्रमांतर्गत मिश्र वणीकरणात निकृष्ट दर्जाचे बांधकाम ! सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी काळी ( दौ ) यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाचं करोडो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता !

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
( आरसीसी सिमेंट वाळू मिश्रित बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे पायाने धक्का दिल्यास बांधकामास पडत आहेत भेगा ! स्थानिक मजुरांच्या हाताने काम करून घेण्यास प्राधान्य देण्या ऐवजी अवजड मशीनद्वारे खोदकाम ) महागांव वार्ता : पुसद वन विभागातील महागाव तालुक्यातील काळी दौलत खान वनपरिक्षेत्रात कासोळा येथे ओसाड वनाचे पुनर्वणीकरण कार्यक्रमांतर्गत कासोळा तालुका महागाव येथे मिश्र वनीकरणाचे मिश्र वनीकरणात वनीकरणात बांधकाम चालू आहे हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा निधी पाण्यात जाण्याची दाट शक्यता आहे सदर वनीकरण क्षेत्र हे 12 हेक्टर परिसरात विस्तारले असून जवळपास 30 एकर जमीन वन जमीन वन जमिनीत हे उभारल्या जात आहे वर्तुळ गोज मधील नियत क्षेत्र कासोळा येथे रोपण क्षेत्रात दहा हजार आठशे झाडांची वृक्षारोपण करण्याची उद्दिष्ट आहे बांधकामाच्या बाह्य सीमांची लांबी 3000 असून हे एक अत्यंत सुंदर असे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येऊ शकते शाळेतील मुलांना सहलीसाठी आणि निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी हे वनपरिक्षेत्र तिनी तालुक्यात प्रसिद्ध प्रसिद्ध होऊ शकते परंतु काळी दौलखांनेतील सहाय्यक व न परिक्षेत्र अधिकारी मेश्राम यांच्या अधिपत्याखालीहे काम होत असून कामाचे योग्य नियोजन आणि दर्जा सुमार असल्यामुळे शासनाच्या आणि वनविभागाच्या ध्येयधोरणांनाच मूठ माती देण्याचे काम सदर वनपरिक्षेत्र अधिकारी करतो अंदाजपत्रक, मजुराचे खोटे मस्टर बनवणे यामध्ये निधीची अपराथापर होण्याची मोठी दाट शक्यता असून सदर बांधकामाची गुणनियंत्रण विभागाकडून पाहणी केल्यास मोठे गोड बंगाल उघड होण्याची शक्यता आहे तरी वरिष्ठ वन अधिकारी यांनी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दोषीवर कार्यवाही करावी अशी परिसरातील नागरिकांची प्रतिक्रिया आहे