विविध मागण्यांसाठी शिवप्रेमींचे उपोषणास्त्रन. प. मधील छत्रपतींचा बंधिस्त पुतळा मोकळा करा

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड
: मागील अडीच वर्षापासून नगरपरिषदेच्या परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आला असून तो मोकळा करण्यासाठी व सगे सोयरे कायद्याचे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज दि 6 जून रोजी तहसील कार्यालयासमोर शिवप्रेमी आमरण उपोषण व आंदोलन सुरू करणार आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल न घेतल्यामुळे उपोषण सुरू करणार असून त्याकरिता तालुक्यातील सर्व शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन उपोषण कर्ते सचिन घाडगे यांनी केले आहे.
बऱ्याच वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे परंतु राज्य सरकारने यावर ठोस पाऊल उचलले नाही मराठा आरक्षण ओबीसी मध्ये देण्याऐवजी दहा टक्के एस इ बी सी मध्ये देऊन समाजाची फसवणूक केली आहे त्यामुळे कुणबी मराठा सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी तसेच मागील अडीच वर्षापासून नगर प्रशासन व काही राजकीय पुढारी महाराजांचा नियोजित पुतळा जागेवर बसवू असे आश्वासन देत असून अद्यापही महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर बसवला नसून सामान्य शिवप्रेमीच्या भावनांशी खेळत आहेत . प्रशासनाला समोर करून पडद्या मागील राजकीय पुढारी करीत असलेले षडयंत्र मोडीस काढण्याकरिता शिवराज्याभिषेक दिनी आज 6 जून रोजी येथील मराठा आंदोलन कर्ते सचिन घाडगे, गजानन जाधव, प्रकाश जाधव तहसील कार्यालय प्रांगणात आमरण उपोषण सुरू करणार आहे.
चौकट
शिवराज्याभिषेक दिनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बंदिस्त असलेला पुतळा मोकळा करण्यासाठी आमरण उपोषण व आंदोलन करावे लागत आहे. हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात दुर्दैवी बाब आहे. सगळे पक्ष शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करत असतात जन भावनेला महत्त्व न दिल्यामुळे त्याचे परिणाम काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या परिणामावर दिसून आले आहे त्यामुळे समाजाचे हे दोन्ही उपरोक्त प्रश्न त्वरित सोडवण्यात यावे सचिन घाडगे मराठा आंदोलक