Uncategorized

महागाव तालुक्यात घरकुल लाभार्थी शासनाच्या पाच ब्रास मोफत वाळू पासून वंचित (भाग 2)


प्रतिनिधी संजय नागरगोजे
माहूरच्या सह्यांदी पर्वत रांगा खाली महागांव तालुका वसल्या मुळे महागांव तालुक्यात वाळूचा मुबलक साठा आहे ! पुस नदी , पैनगंगा नदीचा बराचसा भाग महागांव तालुक्यातील अनेक भागातून जवळून वाहत असल्यामुळे अनेक रेती घाट महागांव तालुक्यात अपलब्द असतांना जुन्या पुसद तालुक्यातील तीनही पुसद, अमरखेड , महागांव तालुक्यात वाळू पुरवण्याची क्षमता महागांव तालुक्यातील रेती घाटांची असतांना महागांव तालुक्यात शासनाने मंजुर केलेल्या 6000 घरकुलांना शासनाने मोफत वाळूचा घरपोच पुरवठा करावा असे निर्देश महसुलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी दिले असतांना महागाव तालुक्यातील गोर गरीब लाभार्थ्यांची घरकुले वाळू अभावी बांधकामे थांबल्यामुळे आपले राहते घर पाडून घरकुल वेळेवर बांधकाम होत नसल्यामुळे घरकुल लाभान्यांना पावसाळ्याच्या दिवसांत यातना सोसाव्या लगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ! शासन निर्णया नुसार रेती देण्यास महागांव तहसीलदार असर्थ ठरत असल्यामुळे घरकुल लाभार्याचा संयमाचा बांध फुटून कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे ! सदर बाबीस महागांव तहसीलदार जबाबदार राहतील अशा ईशारा महागांव तालुक्यातील अनेक गांवातील सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांनी दिला आहे ! आज रोजी या विषयावर महागांव ,फुलसांगी, या दोन गावाचा मंडलाधिकारी राम पंडित यांना संपर्क केला असता घरकुल लाभार्थ्यांना रेती आजपर्यंत देण्यात आली नाही बाबुला विचारायला लागते असे त्यांनी मत मांडले त्यामुळे महसुल मंत्री यांनी दिलेल्या आदेशावर महागांव तहसीलदार पाणी फिरवत असल्याचे वास्तव महागांव तालुक्यात दिसत आहे घरकुल लाभार्थी चिंतातुर ! महसुल प्रशासन अनभिज्ञ !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!