सामाजिक

नवरा व सासरच्या मंडळीने बनावट दस्तऐवज तयार करून माझी फसवणुक केली – डॉ स्नेहल शेगोकार

पीडितेची पत्रकार परिषदेत माहिती

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

उमरखेड :– डॉक्टर असलेल्या महिलेची परस्पर सासरच्या मंडळींनी खोटे कागद पत्रे तयार करून फसवणूक केली तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना पत्रकार परिषद घेऊन पीडित महिलेने सांगितली आहे.
सदर पत्रकार परिषदेत पीडित महिलेने सांगितले की, माझे लग्न जुन २०१८ साली पवन साहेबराव शेगोकार रा. खामगांव यांच्या सोबत झाले सुरुवातीला पाच -सहा महीने सासरकडे चांगले वागवले नंतर त्यांचा मला मानसिक व शारीरीक त्रास सासरच्या लोकांकडुन सुरु झाला मी गर्भवती असताना मला सासरच्या मंडळीने घराबाहेर काढले माझा सतत सासरच्या मंडळीने छळ केला मला आराम करण्याच्या बहानाने माहेरी पाठविले तेव्हा पासुन मला २०१८ पासून ते २०२३ पर्यत कदापिही संपर्क केला नाही तसेच माझ्या विरुद्ध माझ्या पतीने खोटी तक्रार दाखल करून माझ्या जुन्या आधार कार्डाचा गैर वापर करून माझ्याऐवजी बनावट महीला उभी करून खोटे कागद पत्राचा वापर करून माझे लग्न २०१७ साली दुसऱ्या व्यक्ती विष्णु रमेश मोहिते सोबत झाल्याचे न्यायालयात तक्रार करून खोटी केस दाखल केली परंतु माझा न्याय व्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे प्रकरण वाशिम च्या न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे परंतू माझ्ये पती पवन शेगोकार व सासरच्या मंडळीने माझ्यावर शाररिक व मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करून माझ्या नवऱ्यावर व सासरच्या मंडळी ला तात्काळ अटक करावी अशी पिडीत डॉ स्नेहल शेगोकार ( विनकरे ) यांनी पत्रकार परिषद मध्ये आरोप केला आहे. मला व माझ्या साडेपाच वर्षीय मुलीला व माझ्या आई वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा बाळगते अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
यावेळी सरोज देशमुख जिजाऊ ब्रिगेड च्या अध्यक्ष उपस्थित होत्या.

चौकट :
पवन शेगोकार हा सध्या फरार असुन तो माहीती व तंत्रज्ञान अभियंता होता सध्या तो नौकरीवर नसून स्वतःच्या राहत्या घरी सुद्धा नसल्याची माहीती आहे

चौकट :
पिडीतावर पवन ने केलेल्या अत्याचारामुळे स्नेहल च्या वडीलाना मानसिक धक्का बसल्यामुळे त्यांना अर्धांगवायु झाल्यामुळे सध्या ते अंथरुणावर खिळून आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!