Uncategorized

संतोष अण्णा देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडाच्या निषेधार्थ उमरखेड तालुका बंद ठेवण्याचे आवाहन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड दिनांक ५/३/२०२५मसाजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख क्रूर हत्याकांड झाले असून या क्रूर हत्याकांडाच्या करण्याच्या निषेधार्थ दिनांक ६/३/२०२५ रोजी उमरखेड तालुका बंद ठेवण्याचे आवाहन बाबत सकल मराठा समाज उमरखेड चे वतीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना आज रोजी निवेदन देण्यात आले.


सकल मराठा समाज उमरखेडचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबर महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे क्रूर हत्याकांड झाले असून सदरील घटना अतिशय संवेदनशील व मानवतेला काळिमा फासणारी असून सुद्धा त्यामध्ये हवा त्या प्रमाणात तपास होत नसल्याचे जाणवत आहे तसेच या हत्याकांडामध्ये काही मोठे राजकारणी असल्यामुळे त्या ठिकाणी योग्य तो तपास होत नाही असे निदर्शनात येत असल्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा व धनंजय मुंडे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील या प्रकरणांमध्ये सह आरोपी करण्यात यावे या मागणीसाठी सकल मराठा समाज उमरखेड तालुक्याच्या वतीने या क्रूर हत्याकांडाचा जाहीर निषेध करण्यासाठी दिनांक ६/३/२०२५ गुरुवार रोजी उमरखेड तालुका व शहर एक दिवसीय बंद

ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाज उमरखेड च्या वतीने करण्यात आले आहे तरी प्रशासनाने सहकार्य करावे अशी विनंती सुद्धा करण्यात आली आहे. यावेळी समाजसेविका सरोजताई देशमुख, शिवाजीराव माने, श्रीराम चव्हाण, स्वप्निल कनवाळे, सुनील लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे,गजानन कदम प्रवीण देशमुख, ज्ञानेश्वर लोखंडे, गजानन कदम, प्रवीण देशमुख, चांदराव सुरोशे, शुभम माने, विजू भाऊ हरडफकर बळीराम मुटकुळे, वसंतराव देशमुख,शाहरुख पठाण, सह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!