गव्हाचे विक्रमी उत्पन्न काढल्यामुळे शेतकऱ्याच्या मित्रांनी केला शेतकऱ्याचा सत्कार

महागाव प्रतिनिधी
महागाव :-एक बाजू पाहता शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असता प्रभाकर साहेबराव कोपरकर राहणार महागांव यांनी शेतीमध्ये प्रचंड मेहनत घेऊन आणि त्यांच्या दीर्घकालीन शेती करण्याचा अनुभवाचा वापर करून अतिशय मुबलक खर्चात विक्रमी उत्पन्न काढून अशा या मेहनती शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला व याबद्दल त्यांच्या अतिशय जवळ असलेल्या दीपक गाडबैले व प्रवीण गावंडे या मित्र शेतकऱ्यांच्या सल्ल्यावरून त्यांचा जिजाऊ चौक महागांव या ठिकाणी सत्कार करण्यात आला व त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की शेतकऱ्यांने खचून न जाता शेतीमध्ये शेतीची व जे पिक उत्पन्नासाठी लावणार आहोत त्याविषयी माहिती काढून व प्रचंड प्रमाणात मेहनत घेऊन शेती करावी जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये व त्यांनी असे सांगितले मी माझ्या शेतात गव्हाचे सात बॅग सरिता नावाचे वान घेऊन 110 क्विंटल गव्हाचे उत्पन्न काढले व प्रचंड मेहनत घेऊन उत्पन्न काढले व यावेळी त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील नरवाडे विवेक नरवाडे सुरज धोंगडे रुद्र दळवे व शेतकऱ्यांमध्ये तुकाराम गाडबैले बंडू पाटे दिगांबर गाडबैले संजय नरवाडे नरेंद्र गाडबैले इत्यादी नागरिक मोठ्या संख्येनेउपस्थित होते