हत्येच्या निषेधार्थ उमरखेड कडकडीत बंद!संतोष देशमुख यांच्या हत्येतील दोषींना फाशीची शिक्षा द्या, प्रकरणाची सखोल चौकशी करा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड:- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत अमानुषपणे हत्या करून त्यांच्या मृतदेहाची क्रूरपणे विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गृन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा दया व गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्या राजकीय व्यक्ती व तत्कालीन तपास अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 6) उमरखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीसह या हत्याकांड प्रकरणात वाल्मीक कराड व गुन्हेगारी टोळी व यांना समर्थन देणारे राजकीय पुढाऱ्यांची तसेच या तपासातील तत्कालीन तपास अधिकारी यांची सुद्धा चौकशी लावण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने होत असताना त्याचे लोण उमरखेड पर्यंत पोहोचले तसेच महाराष्ट्रात गुन्हेगारीला पोसणाऱ्या राजकिय नेत्यांचा ही बंदोबस्त करून त्या सर्वावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी या कडकडीत बंदच्या माध्यमातून सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आज सकाळपासूनच शहरातील गांधी चौक खडकपूरा हदगाव रोड पुसद रोड, महागाव रोडवरील प्रतिष्ठाणे नागचौक सराफा दुकाने मुख्य बाजारपेठ व शहरातील छोट्या व्यवसायीकांनी दुकाने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळून बंद मध्ये आपला सहभाग नोंदविला
चौकट
मानवतेला काळीमा फासणारी घटना
सदर घटना अतिशय दुर्देवी व मानवतेला काळीमा फासणारी असल्यामुळे उमरखेड तालुक्यातील जनसामान्य नागरिकांकडून या घटनेचा निषेध व्यक्त होत असून कार्यवाहीचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे. या बंदला उमरखेड व्यापारी संघटनेच्या वतीने समर्थन देत संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.