Uncategorized

घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या वर कठोर कारवाई करा ! मराठा सेवा संघाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी

शेख मुजाहिद ससंपादक मो 7798306192

उमरखेड इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्य केले व छत्रपती शिवाजी महाराजा बाबत अवमानकारक वक्तव्यात बाबत प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मराठा सेवा संघ उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे
महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारे वक्तव्य प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना आपल्या नावाचा तसेच पदाचा उल्लेख करून जीवे मारण्याची धमकी फोन कॉल व्दारे देण्यात आली महाराष्ट्रातील जातीय एकोपा अबाधित राहावा व पुरोगामी महाराष्ट्रातील तमाम महापुरुषांचा आणि त्यांच्या विचाराचा सन्मान ठेवला जाईल याकरिता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कदम,कार्याध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष अँड शिवाजीराव वानखेडे, अँड.श्रीकांत कदम, अँड कैलास सावतकर, एडवोकेट दवणे, जी के राऊत दत्तात्रय महाजन , गणेश बोडखे यांनी केले आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!