पुसद शहर पोलीस स्टेशन हददीत 500 रुपयाच्या चलनी नोटा बनविणा-या 04 इसमांना अटक

ऐकून मुददेमाल 1,91,624/- रु जप्त
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
दिनांक 05/06/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पाहीजे आरोपी शोध, अउघड गुन्हे कारवाई करीता रात्री पेट्रोलोंग करीत असतांना गोपनिय बातमीदार मार्फत खात्रीशिर माहीती मिळाली कि, नवीन पुसद येथील भाडयाचे रुम मध्ये राजकुमार पारधी हा राहत असून त्याचेकडे काही संशयीत इसम आलेले असून ते 500/- रु दराच्या बनावट चलनी नोट तयार करित आहे. अशी गोपनिय माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने नवीन पुसद येथील मिळालेल्या माहीच्या ठिकाणी जावून त्याचे घराच्या चारही बाजूने सापळा लावला असता एक इसम संशयीरित्या हालचाल करीत असतांना दिसून आल्याने त्यास पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजकुमार श्रावन पारधी रा. सावळी ता. मानोरा जि. वाशिम असे सांगून मी सध्या याच घरात मी माझ्या परिवारासह भाडयाने राहत असल्याचे सांगितल्याने त्याचे समक्ष घरात प्रवेश केला असता घराच्या बेडरुम मध्ये 3 इसम गोल रिंगन करुन त्यांचे समोर व बाजूला 500/- रु दराच्या चलनी नोटा, दोन वर्तुळाकार काच, तसेच 500/- रुपयांचे नोटाचे आकारचे को-या कागदाचे बंडलच्या सहाय्याने वेगवेगळ्या कंपनीचे केमीकलच्या बॉटल व केमिकल मिश्रीत नोटाचे आकाराचे काळपट कागदाच्या सहाय्याने भारतीय बनावटीचे चलनी नोटा बनवित असल्याचे दिसून आल्याने पंचा समक्ष त्याचे समोरील 500/- रु दराच्या नोटाची पडताळणी केली असता त्याचे ताब्यात एकूण 117 नोट 500/- रु दराच्या चलनी नोटाची प्रखर लाईटच्या उजेडात निरीक्षण केले असता त्यामध्ये 04 नोट बनावट असल्याचे दिसून आल्याने नमूद नामे-1) राजकुमार श्रावन पारधी रा. सावळी ता. मानोरा जि.वाशिम सध्या रा.नवीन पुसद ता. पुसद जि.यवतमाळ 2) तुकाराम दामाजी गुहाडे रा.हषी ता. पुसद जि.यवतमाळ 3) भाउसाहेब आनंदराव पतंगे रा. कोंबूर ता. कळमनुरी जि. हिंगोली 4) रामदास किसन भरकाडे रा. डोणवाडा ता. वसमत जि. हिंगोली असे असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणावरुन नोटाचे आकारचे को-या कागदाचे बंडल, वेगवेगळ्या कंपनीचे केमीकलच्या बॉटल व केमिकल मिश्रीत नोटाचे आकाराचे काळपट कागद, 2 गोलाकार काच तसेच 500/- रु च्या 04 बनावट नोटा, तसेच 113 नोट 500/- रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा व इतर साहोत्य असे एकूण 1,89,624/- रु मुददेमाल ताब्यात घेवून इसम नामे-1) राजकुमार श्रावन पारधी रा. सावळी ता.मानोरा जि.वाशिम सध्या रा. नवीन पुसद ता. पुसद जि. यवतमाळ 2) तुकाराम दामाजी गुहाडे रा.हषी ता. पुसद जि. यवतमाळ 3) भाउसाहेब आनंदराव पतंगे रा. कॉढूर ता. कळमनुरी जि. हिंगोलो 4) रामदास किसन भरकाडे रा. डोणवाडा ता. वसमत जि. हिंगोली व इतर 5) पंडीत भालेराव रा. शिवनी ता. कळमनुरी जि. हिंगोली यांच्या विरुध्द पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री.कुमार चिता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप (म.पो.से) सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक श्री. हर्षवर्धन बी जे सा. (भा.पो.से) सा मा.पोलीस निरीक्षक श्री.सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, पोहबा/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोहवा तेजाब रणखांब, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे