Uncategorized

नागठाणा येथे भीम टायगर महिला आघाडी ची कार्यकारणी गठीत

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

यवतमाळ (दिनांक ५ सप्टेंबर) ला गाव गुजरी (नागठाणा) तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे सर्व समाज बांधवांशी सामाजिक चर्चा करून भीम टायगर सेना महिला आघाडी ची शाखा स्थापन करण्यात आली.

ज्वलंत आंबेडकरवादाचा पुरस्कार करणार लढाऊ, वैचारीक व आक्रमक असलेल अराजकीय सामाजिक संघटना. प्यार का जवाब प्यार से वार का जवाब तलवार से हे ब्रीदवाक्य घेऊन भीम टायगर सेना समाजातील लोकांवर होणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काम करणारे एकमेव राजकीय संघटन आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक, फायर ब्रँड वक्ते दादासाहेब शेळके यांच्या आदेशानुसार संपूर्ण संघटनेचे सर्व पदाधिकारी जोमाने काम करत आहेत.

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष गोपीचंदजी ढाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष प्रविण ऊर्फ पिंटू कांबळे, प्रमोद भगत, बबलू ताकसांडे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

भिम टायगर सेना महिला आघाडी शाखा अध्यक्षपदी स्वाती दारुडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष शिल्पा दरोडे, सचिव वंदना बेताल, कार्याध्यक्ष म्हणून सुनंदा लोटकर यांची नियुक्ती करण्यात आली.
तर सदस्य म्हणून गीता नगराळे, बेबीबाई खैरकार, लक्ष्मीबाई कांबळे, मायाबाई कांबळे, चंदाबाई बेताल , मिराबाई नगराळे, वंदना खैरकार , पंचशीला बेताल,पार्वताबाई कांबळे, विठाबाई थुल, रत्नमाला कांबळे या सर्वाची निवड करण्यात आली. भीम टायगर सेना शाखा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
सदर कार्यकारणी गठीत झाल्यामुळे भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी पुढील सामाजिक कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यवतमाळ जिल्ह्यातून सर्व स्तरावरून या सर्व महिला मंडळांना शुभेच्छांचा वर्षाव होतांना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!