Uncategorized

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दया ! अन्यथा गय केल्या जाणार नाही – – आ.किसन वानखेडे उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192



उमरखेड : दि २१ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखाना नेत नसल्याने शेतकरी वर्ग कमालीचा अस्वथ झाला असून आर्थिक पिळवणूक होत असल्याने उमरखेड महागाव तालुक्यात कार्यरत साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना धारेवर धरत वेळेत ऊस तोडणी करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांना न्याय दयावा अन्यथा शेतकऱ्यांबाबत उदासिन धोरण अवलंबविणाऱ्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे आमदार वानखेडे यांनी उपविभागीय कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना खडसावले .
यावेळी भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा व उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जळीत उसास सुपर करावा, जळीत उसास सुद्धा फ़्रेश उसाचा दर लागू करावा.,ऊस उत्पादकांचा तात्काळ विनाविलंब तोड करून वहन करण्यात यावे,ऊस उत्पादकांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी विविध उपाय योजना करावी,ऊसतोड कामगार पळून गेल्यास त्यांना शेतकरी व वहन करणारे गाडी मालक यांना बसणाऱ्या आर्थिक भुर्दंडाची हमी संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापकी संचालकांनी घ्यावी., ज्या परिसरात ऊसतोड करणारे हार्वेस्टिंग मशीन आहे,तेथील पूर्ण ऊसतोड झाल्याशिवाय हार्वेस्टिंग मशीन तेथून हलवू नये शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट व तोड वाहतूक ऊस वहन झाल्यानंतर १५ दिवसाच्या आत देण्यात यावे.,कारखाना बंद झाल्यानंतर ऊसतोड वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांचे कमिशन डिपॉझिट एका महिन्याच्या आत देण्यात यावे.,तोड मशीन/केन हार्वेस्टरची संख्या वाढविण्यात यावी याबाबत आमदार किसन वानखेडे यांनी सूचना केल्या.
तर यवतमाळ, पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा यांनी राज्यात उसाचे जादा उत्पादन केवळ यवतमाळ व नांदेड या दोन जिल्ह्यातच आहे. त्यात उमरखेड व महागाव या फोन तालुक्यात मोठ्याप्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहे. त्याअनुषंगाने सर्व साखर कारखान्यांना उमरखेड विधानसभेतूनच ऊसाची संजीवनी पुरविली जात असल्यामुळे कारखादारांनी हमी भाव जास्त देत विनाविलंब उसाची रक्कम शेतकऱ्यांना द्यायला हवी.तसेच पुढील हंगामाची कार्येक्रम पत्रिका देखील जाहीर करून प्रत्येक ऊस उत्पादकांना द्यायला हवी अशी सूचना केली.
स्थानिक ऊस उत्पादकांना त्रास होता कामा नये अशी तंबी देखील यावेळी भुतडा यांनी भरली.
ऊस उत्पादकांच्या प्रश्नांबाबत दि.20 जानेवारी 2025 रोजी उमरखेड उपविभागीय अधिकारी यांचे दालनात आयोजित बैठकीत उपस्थित सुभाष शुगर फॅक्टरी प्रा.लिमिट्स हडसनी ता.हदगाव जि.नांदेड , युनिट क्रमांक– 1 चे एमडी मधुकर पतंगे, भैरवनाथ शुगर प्रा.ली., भाडेतत्व वसंत सहकारी साखर कारखाना,पोफाळीचे एमडी दिनेश परमार, नॅचरल शुगर युनिट क्रमांक 2, गुंज ता.महागाव येथील एमडी कदम,डेक्कन शुगर फॅक्टरी, बोदेगाव ता.यवतमाळचे एमडी ए. बी.कदम, शिवूर शुगर फॅक्टरी, वाकोडी ता.कळमनुरी जि.हिंगोली, युनिट क्रमांक- 2 चे एमडी देशमुख, स्व भाऊराव चव्हाण साखर कारखाना युनिट क्र.2, डोंगरकडा जि.नांदेडचे एमडी पाटील, टोकाई सह साखर कारखाना, वसमत जि.हिंगोलीचे एमडी गुणवंत हाराळे
इत्यादी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना उमरखेड विधानसभेतील ऊस उत्पादकांना त्रास देणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असा सज्जड दम यावेळी आमदार किसन वानखेडे यांनी भरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!