इसमाचा बेवारस स्थितीत मृतदेह आढळलाभुकबळीने मृत्यू झाल्याची शंका

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :-येथील बस स्थानकासमोरील अंबा लॉजजवळ कुणीतरी अज्ञात इसम मरण पावला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिल्यावरून दुपारी 1वाजताचे दरम्यान उमरखेड पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी प्रेत शासकीय रुग्णालय पाठविण्यात आले .त्यानंतर सदर मृतक हा नामे मलंग अजिस खान वय 45 वर्षे राहणार गणेश नगर माहूर असे नाव असल्याची ओळख पोलिसांना पटली .त्यावरून उमरखेड पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांना बोलावून शहानिशा केली असता सदर व्यक्ती हा 20 वर्षापासून भीक मागून खात असल्याचे व मनोरुग्ण असल्याचे नातेवाईकाकडून कळाले .भूकबळीमुळे सदर इसमाचा मृत्यू झाला असावा असा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे .पोलिसांनी आकस्मित मृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे .पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुदर्शन वानोळे करीत आहे .