Uncategorized

कोदंरी येथे पांदण रस्ता बंद केल्याने तहसीलदार अभय मस्के यांची धाव वृत्तपत्राची दखल; घटनास्थळी पाहणी करून रस्ता तात्काळ मोकळा करण्याचे निर्देश


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मौजा कोदंरी येथे चाळीस वर्षांपासून वापरात असलेला पांदण रस्ता अतिक्रमण करून बंद करण्यात आल्याची तक्रार प्राप्त होताच तहसीलदार अभय मस्के यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधितांना शेतकऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली.
प्रेम बाला राठोड व भिकम बाला राठोड यांनी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या शेतात जाण्यासाठी गेल्या चाळीस वर्षांपासून पांदण रस्त्याचा वापर करण्यात येत होता. मात्र, ख्वाजा आफताब अहमद यांनी गट क्रमांक १८ मधील शेतात नांगरणी करून सदर मार्गावर अतिक्रमण केल्याने शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला असून पेरणीची कामेही खोळंबली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.
तक्रारीची दखल घेत तहसील प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली असता वस्तुस्थिती निदर्शनास आल्याने संबंधित गैरअर्जदारास नोटीस बजावून पांदण रस्ता तातडीने मोकळा करून देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button