Uncategorized

पोलीस स्टेशन पुसद शहर हददीत गांजा अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची NDPS कायदया अंतर्गत कारवाई

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समूळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

दिनांक 14/01/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन पुसद शहर हददीतील मौजे-केडी जाधव तांडा शेजारी शेतशिवारात शेतातील असलेल्या झोपडीमध्ये गुलजमान ऊर्फ भु-या खान हा गांजा अंमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात बाळगुन विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन मौजे केडी जाधव तांडा येथे लावलेले सापळा कारवाई करुन मौजे केडी जाधव तांडा शेताच्या पश्चिम बाजूस असलेल्या झोपडीमध्ये गुलजमान ऊर्फ भू-या खान अलीयार खान वय 45 वर्ष रा. गढीवार्ड पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यास ताब्यात घेवून त्याचे झोपडीतून त्याचे ताब्यातील विक्री करीता असलेला 4 किलो 637 ग्रॅम गांजा, मोबाईल, विक्रीचे साहीत्यासह एकूण किंमत 1,03,360/- रु चा मुददेमाल जप्तीसह अमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8(c), 20(b), (B) अन्वये अपराध क्रमांक 13/2025 प्रमाणे पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप (म.पो.से) सा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक श्री. हर्षवर्धन बी जे सा. (भा.पो.से) सा मा.पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोलीस निरीक्षक श्री. उमेश बेसरकर, पोलीस स्टेशन पुसद शहर, यांचे मार्गदर्शनात पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच पुसद शहर पोलीस स्टेशन पोहवा दिनेश सोळंखे चापोहवा विनोद सरकुडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!