Uncategorized

निमगव्हाण मारलेगाव संगम चिंचोली पोफाळी व उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध रेती उपसा व अवैध रेती विक्री व्यवसाय जोरात! पोफाळी व उमरखेड पोलीस व उमरखेड महसूल विभागाचे दुर्लक्ष की अर्थपूर्ण दुर्लक्ष? नागरिक संभ्रमात! शासनाच्या महसुलाची अशी तैशी!

हमीदुल्ला खान जिल्हा प्रतिनिधी

पोफाळी व उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध रेती उपसा व रेती विक्री व्यवसाय जोरात सुरू असून अनेक प्रकारचे अवैध धंदे फोपावले आहेत निमगव्हाण मारलेगाव संगम चिंचोली मुळावा गौळ पोफाळी पळशी जणूना हातला नांदला झाडगाव तीवरंग वगैरे भागात अवैध धंदे अवैध रेती उपसा व अवैध रेती विक्री महसूल प्रशासन व उमरखेड पोलीस व पोफाळी पोलिसांच्या नाकावर टिचून जोरात चालू आहे गौळ भागातही अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून मागे नुकतेच उमरखेड पोलिसांनी अवैध रेती टिप्पर पकडले होते व तोतया पोलिसांना जेरेबंद केलेल्याची घटना घडली होती मटका जुगारही जोरात सुरू आहे परंतु पोफाळी पोलिसांचे व उमरखेड महसूल प्रशासनाचे ह्या सर्वे धंद्याकडे दुर्लक्ष आहे की अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे याबाबत नागरिक संभ्रमात आहेत
पैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या निमगव्हाण मारलेगाव संगम चिंचोली पळशी दिवट पिंपरी हातला नांदला मुळावा झाडगाव तीवरंग नदीपात्रातून बेसुमारपणे रेती उपसा सुरू आहे जणूना वगैरे परिसरातूनही नाल्यातील रेती अवैध पणे विकल्या जाते अशी माहिती आहे सदर रेती अवैध उत्खनन करून अवैध रित्या ठिकठिकाणी विकली जाते शासनाचे लाखो रुपयाची रॉयल्टी बुडून हा अवैध रेती व्यवसाय रेती माफिया दिवसाढवळ्या व रात्री करीत असतात परंतु पोफाळी पोलीस व उमरखेड पोलीस व महसूल विभाग ह्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे महसूल विभागाचे रेती पकडणारे पथक ह्या भागात फिरकत नाही अशी माहिती असून ह्या परिसरातील तलाठी व मंडल अधिकारी हेडक्वार्टरलाच राहत नसल्यामुळे रेती माफियाचे चांगभले होत आहे रेतीवर कुठे धाड मारायची व कुठे नाही हे उपविभागीय कार्यालयातून व तहसील कार्यालयातून काही कारकून मंडळी ठरवित असतात अशी जोरदार चर्चा असून ह्या कामात निष्णात असलेला महागावचा बाबू उमरखेड येथे महसूल कार्यालयात आणल्यामुळे तो व्यवस्थित सेटिंग बसून देतो त्यामुळे अवैध रेती व्यवसायिकाला आपल्या अवैध रेती विक्रीचे धंदे व्यवस्थित करता येत आहेत त्यासाठी महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांना हिस्से दिल्या जात असल्याची चर्चा आहे अशा दीपकांना उपविभागाच्या बाहेर त्यांच्या बदल्या केल्याशिवाय अवैध रेती व्यवसायावर महसूल अधिकाऱ्यांना व पोलीस अधिकाऱ्यांना वचक ठेवता येणार नाही हा रेतीचा धंदा दिवसा व रात्री होत असल्यामुळे पोफाळी व उमरखेड पोलिसांना दिवसा व रात्री पेट्रोलिंग करताना ह्या अवैध रेतीच्या गाड्या कशा दिसत नाहीत? हा प्रश्न लोकांत चर्चिला जात आहे त्यामुळे रेतीचा धंदा तेजीत असून त्या धंद्याला धक्का न लागता तो महसूल विभागाच्या व पोफाळी व उमरखेड पोलीसा़च्या मेहरबानीने अक्षय आहे आता दस्तूरखुद पोलीस उप अधीक्षक तथा उपविभागीय महसूल अधिकारी यांनीच रेती माफिया वर कारवाई करून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाचे होत असलेली ऐसी तैसी थांबवावी आपापल्या विभागातील शेत खाणाऱ्या कुंपणावर देखील कडक कारवाई करावी अथवा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी ह्या रेतीमाफीच्या मुसक्या आवळून त्यांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी व महसूल विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी व शासनाचा लाखो रुपयाचा बुडणारा महसूल वाचवावा तरच रेती माफिया चे थैमान बंद होऊ शकते व गोरगरीब सर्वसामान्य लोकांना घर बांधण्यासाठी स्वस्त दरात रेती उपलब्ध होऊ शकते तूर्तास एवढेच! बाकी सविस्तर चर्चा तर होणारच!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!