सामाजिक

भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण, उमरखेड २०२५ राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार जाहीर

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड: पुरस्काराचे विशेष मानकरी कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री-नागपूर, मनिषा शेलार-पुणे, मंगला माळवे-यवतमाळ, सोनाली कराळे अहिल्यानगर, रामकृष्णा सोनकुसरे-भंडारा, डॉ. नितीन गुप्ता-अकोला, शिवाजीराव राजपूत-धुळे, डॉ. मुसा मगदूम कोल्हापूर यांचा समावेश.

दरवर्षी प्रमाणे सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिदिना निमित्त, भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण, उमरखेड तर्फे कृषी शास्त्रज्ञ, शेतकरी, कृषी उद्योजक, प्रसार माध्यमे व कृषी विद्यार्थी यांच्यात संवाद होऊन आधुनिक शेती व प्रगतशिल शेतीतील आव्हाने स्विकारुन कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करणा-यांसाठी दिला जाणारा राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार ह्या वर्षी दि. ११ जानेवारी २०२५ रोजी देण्यात येणार आहेत.

विदर्भातील शेतक-यांच्या होत असलेल्या आत्महत्येला उपाय म्हणून, शेती संबंधीत सर्व अडचणीवर मात करीत शुन्यातून विश्व निर्माण करणारे व स्वकर्तुत्वावर स्वतःचे आर्थिक नियोजन करुन इतरांनाही आपल्यासोबत कार्यास प्रवृत्त करणारे, स्वतः सोबतच आपण समाजाचे सुद्धा हित साधू शकतो ही भावना जपणारे कष्टकरी व्यक्तींचा यथोचीत सत्कार करुन त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सामान्यातील सामान्य शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व त्यातून मार्गदर्शन घेऊन इतरही शेतकरी बांधवांनी त्यांच्या सारखी शेती विषयक कार्यात भरारी घेऊन, सोबतच शेतीला पुरक व्यवसाय जोडून परंपरागत शेती व्यवसाया सोबतच दुग्ध उत्पादन, शेळी पालन, कुक्कुट पालन व इतरही असे अनेक पुरक व्यवसाय शेतीला जोडले तर नक्कीच त्या शेतक-यांची उन्नती व भरभराट होईल. शेतीला पूरक व्यवसाय कसे जोडावेत व अनेक अडचणींना समोर जात त्यातून मार्ग कसा काढावा या व अशा अनेक विषयांवर या सोहळ्यात उपस्थित पुरस्कारप्राप्त शेतकरी आपले अनुभव शेतक-यांना कथन करतील त्यांनी सांगीतलेल्या अनुभवातून आपल्या परिसरातील शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विज्ञान मंचच्या माध्यमातून भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण, उमरखेड हा उपक्रम २००६ पासुन राबवीत आहेत.

कृषी विद्यापीठाचा प्रत्येक घटक आणि संलग्नीत कृषी महाविद्यालयामध्ये कृषी विज्ञान मंच या उपक्रमा अंतर्गत शेतकरी उपयोगी कार्य करण्यात नियोजीत केले जाते. त्या अनुषंगाने कृषी क्षेत्रात सर्वात आधी शेती, सर्वात कमी खर्चाची शेती व दररोज पैसा देणा-या पुरक व्यवसाय करणा-या शेतक-यांना त्यांच्या महत्वपूर्ण सामाजिक योगदानाबद्दल सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण उमरखेड व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न कृषी विज्ञान मंच कृषी महाविद्यालय, उमरखेड यांचे उपक्रमाद्वारे गेल्या ३१ वर्षापासून दिल्या जाणा-या भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराची घोषणा डॉ. विजयराव माने, मार्गदर्शक भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण, उमरखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव वानखेडे व उपाध्यक्ष डॉ. गणेश जाधव आणि इतर निमंत्रीत कृषी शास्त्रज्ञ व अधिकारी ह्यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे, दररोज पैसा प्राप्त करणारे शेतकरी व इतर मान्यवरांची खालील प्रमाणे गटनिहाय निवड करुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ह्या बाबतचे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब ओझलवार यांचेकडून जाहीर करण्यात येत आहे. सत्यशोधक भाऊसाहेव कृषी गौरव पुरस्कार

:

श्री कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत भिवराज कलंत्री, विवेकानंद नगर, नागपूर

कृषी शास्त्रज्ञ

: श्री डॉ. मुसा बाबालाल मगदूम, नायला पार्क, कोल्हापूर

फुल शेती

श्री डॉ. नितीन सुबोध गुप्ता, विभागप्रमुख पुष्पशास्त्र, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला

कृषी संशोधन व विस्तार: डॉ. विजय शेलार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

कृषी उद्योजक (रेशिम):’ रामकृष्ण सोनकुसरे भंडारा सिल्क प्रायव्हेट लिमिटेड मोहदी

कृषी प्रसार माध्यम मंगला सदाशिव माळवे यवतमाळ आकाशवाणी

कृषी प्रसार माध्यम: गोपाल जगन्नाथ हागे अकोला दैनिक वृत्तपत्र

कृषी तज्ञ, कृषी लेखन सचिन आत्माराम होळकर लासलगाव

शेळी पालन (आधुनिक तंत्र): सोनाली दत्तात्रय कराळे रा . जांभोळ

शेतीपुरक (रेशिम उद्योग).
सिद्धेश्वर रामचंद्र बिच्चेवार विडूळ

दूग्ध उत्पादक: गजानन मोहनराव पठाडे चोरजवळा हिंगोली

सामूहिक रेशीम शेती श्री कालिदास माणिकराव नवले (सरपंच) मु.पो. रुई (रेशमाची) ता. गेवराई जि. बिड

कर्तुत्ववान महिला शेतकरी सौ. मनिषा काळुराम शेलार, उदळी ता. हवेली जि. पुणे

वृक्ष संवर्धन पर्यावरण :श्री शिवाजीराव लोटनसिंग राजपूत, भोरखेडा ता. शिरपूर जि. धुळे
शेतीपूरक .: प्रतीक एकनाथ साबे आडवी
गांडूळ खत निर्मिती सेंद्रिय शेती : श्री निलेश श्रीराम टाके, गोधणी:

श्री सुरेशसिंग चेतनसिंग ठाकुर, दांडेगांव ता. कळमनुरी जि. हिंगोली

श्री प्रतिक एकनाथ सावे, आडविहीर ता. माताळा जि. बुलढाणा (कुक्कुट (शेळी पालन)

वृक्ष संवर्धन/पर्यावरण: शिवाजीराव राजपूत भोरखेडा जि.धुळे

गांडूळ खत निर्मिती: निलेश टाके गोधनी यवतमाळ

भाजीपाला व फळपिके रोपवाटिका (शेतीपूरक): सुरेश सिंग चेतन सिंग ठाकूर दांडेगाव तालुका कळमनुरी

कृषी प्रक्रिया उद्योग दुग्ध प्रक्रिया व्यवसाय: सुधाकर महादेवराव ठाकरे बाबुळगाव यवतमाळ

:

नियमीत भाजीपाला उत्पादक : संतोष उत्तम सूर्यवंशी काशीळ जि. सातारा

भाजीपाला परसबाग सामुहिक व्यवस्थापन: अध्यक्ष शाळा सुदर समिती जि प प्राथमीक शाळा चातारी तालुका उमरखेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!