पत्रकार बांधवांची लेखणी करते अन्याय अत्याचारा वर प्रहार-सरोजताई देशमुख

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
उमरखेड दिनांक ८ जानेवारी २०२५
आद्य महिला पत्रकार तानुबाई बिर्जे तसेच दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते आणि या दिवशी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत केल्या जाते याच धर्तीवर उमरखेड शहर व तालुक्यातील विविध पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांची समिती गठित करण्यात आली.
कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता दररोज घडत असलेल्या चांगल्या वाईट गोष्टी-घटना, समाजातील अन्याय,अत्याचार, अज्ञानमयी अंधकार अशा अनेक प्रकारच्या बाबी आपल्या लेखणीतून मांडून जनतेची व प्रशासनाची अहोरात्र सेवा करणाऱ्या पत्रकार बांधवांना कोणते मानधन असते ना कोणत्या सुविधा असतात तरीही ते आपले कार्य अविरतपणे करीत असतात अशा या पत्रकार बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील यांनी शासकीय विश्राम गृह उमरखेड येथे पत्रकार संघातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान केला यावेळी शिवसेना (उबाठा) चे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.त्याचप्रमाणे सामाजिक सेवेचे व्रत अंगीकारलेल्या

समाजसेविका तथा देशमुख कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय उमरखेड च्या संचालिका रणरागिनी सरोजताई नंदकुमार देशमुख यांनीही विद्यालयाचे प्रांगणात समस्त पत्रकार संघातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान करून पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणीतून समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी आपली लेखणी चालवून तळागाळातील सामान्य जणांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन त्यांनी केले. आगळ्यावेगळ्या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकार बांधव भारावून गेल्याचे दिसत होते.