सामाजिक

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी शिक्षण संस्था द्वारा संचालित देशमुख कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय उमरखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन घेण्यात आला

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

आज दिनांक 6 दिसंबर 2024 वार शुक्रवार रोजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणनामध्ये संस्थेच्या संचालिका शिवमती देशमुख मॅडम यांच्या अध्यक्ष ते खाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथि दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले‌. संस्थेच्या संचालिका शिवमती देशमुख मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून स. सुनीलभाऊ चिंचोलकर (जिल्हाध्यक्ष रिपब्लिक युवा सेना), स. नाथा पाटील( तंटा मुक्ती अध्यक्ष मार्लेगांव) , स. विरुभाऊ खंदारे ( काँग्रेस शहराध्यक्ष), स. सिद्धोधनभाऊ दिवेकर शहराध्यक्ष (रिपब्लिक युवा सेना), स. सचिनभाऊ खंदारे, स. अनिलभाऊ बरडे, स. संभाजीराव विणकरे, स. विलासराव कदम, प्राचार्य वानखेडे सर, मुख्याध्यापक लोमटे सर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत घेऊन करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषण व गीते सादर केलीत.तसेच प्रमुख पाहुणे सुनील भाऊ चिंचोलकर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. व तसेच प्रमुख पाहुणे वीरू भाऊ खंदारे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. देशमुख मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपणं आचरणात आणले पाहिजे आत्मसात केले पाहिजे.त्यांनी लीहलेल्या संविधानाची प्रत्येकानी जनजागृति केली पाहिजे.त्यांनी जशी समाजासाठी आपली संघर्षातून ज्योत पेटवून बहुजन समाजाची ज्योत प्रज्वलित केली ती आपणं जपुन ठेवण्याचं काम करून बाबासाहेबांच्या विचारांचा, त्यांनी


केलेल्या कार्याचा आपल्या जीवनात अंगीकार करावा असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमास पालक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगत सर यांनी तर आभारप्रदर्शन मुसळे सर यांनी केले.

          चौकट

डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या संविधान आचरणात आणून त्यांची जोपासना करणे ही काळाची गरज.
सरोज नंदकिशोर देशमुख.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!