यवतमाळ आयटीआय येथे संविधान मंदिराचे उपराष्ट्रपतींच्याहस्ते उद्घाटन

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798606192
संयुक्त राष्ट्र संघटनेच्यावतीने दि.15 सप्टेबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्याता विभागामार्फत एलफिन्स्टन्स टेक्नीकल हायस्कुल, मुंबई येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याहस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयटीआय यवतमाळ येथील मंदिराचे उद्घाटन देखील त्यांच्याहस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. यवतमाळ सोबतच
महाराष्ट्रातील ४३४ आयटीआय
व टेक्नीकल हायस्कुलमध्ये सुद्धा आभासी पदधतीने संविधान मंदीराचे उद्घाटन करण्यात आले. आयटीआय यवतमाळ येथे उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी आ. मदन येरावार, प्राचार्य व्ही.जे. नागोरे, रेमण्ड युको डेनिम प्रा.लि.चे वर्क्स डायरेक्टर नितीनकुमार श्रीवास्तव, सारा स्पिन्टेक्स प्रा.लि.चे मॅनेजींग डायरेक्टर जाफर गिलाणी, जय अँग्रो इंन्डस्ट्रीजचे मॅनेजींग डायरेक्टर ज्ञानेश्वर खताडे, एल.के. इन्डस्ट्रीजचे नाजीम खान उपस्थित होते. विविध बोली, भाषा, वेशभुषा असणाऱ्या देशाला एकसंघ
ठेवण्याचे काम संविधान करीत असल्याचे मत यावेळी आमदार मदन येरावार यांनी व्यक्त केले. कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राच्या निर्मातीमध्ये आयटीआयचे योगदान महत्वपुर्ण असल्याचे मत संस्थेचे प्राचार्य श्री. नागोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्रबंधक अनिल भुते यांनी केले. संचलन अनिल पिंगळे यांनी केले तर आभार सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार
राकेश कोडापे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य नितीन खडसे व त्यांच्या चमूने लाभले.
मुंबई येथे येथील उदघाटन सोहळा ऑनलाईन पहाण्यासाठी संस्थेमध्ये इंटरअॅक्टीव्ह पॅनेलची व्यवस्था करण्यात आलेली होती. दरम्यान संस्थेमध्ये तीन दिवस संविधान महोत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान संस्थेमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यकम अधिकारी श्री. मेश्राम व शैलेश शिरभाते यांच्याद्वारे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना उद्घाटन सोहळयामध्ये प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले.