सामाजिक

संयुक्त पत्रकार संघाची कार्यकारीणी गठीतअध्यक्षपदी प्रवेश कवडे तर सचिव पदी सुनील लोखंडे

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

दिनांक ७ जानेवारी २०२४
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून संयुक्त पत्रकार संघ उमरखेड या संघाची दरवर्षीप्रमाणे नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात येते परंतु दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी शासकीय विश्रामगृह उमरखेड येथील सेवक खलील भाई यांचा हृदयाच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला त्यामुळे संयुक्त पत्रकार संघाने आपल्या कार्यकारिणीची निवड दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी गठीत केली.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती चे विश्रामगृहात आज दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी संयुक्त पत्रकार संघाचे मार्गदर्शक शिवाजीराव माने यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच खालील भाई यांना श्रद्धांजली अर्पण करून सन २०२४ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली सदर कार्यकारणी मध्ये संयुक्त पत्रकार संघा चे अध्यक्ष पदी प्रवेश कवडे तर सचिव पदी सुनील लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी शेख इरफान शेख इसा तर सहसचिव पदी सुरेंद्रनाथ दळवी तर सल्लागार पदी रितेश पाटील कदम यांची निवड करण्यात आली. शेख तहेसीन शेख भिक्कन, विशाल मस्के, सय्यद खाजा सय्यद मौला, गजानन वानखेडे, शेख मुजाहिद शेख इसा यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणी चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले संयुक्त पत्रकार संघाचे मार्गदर्शक शिवाजीराव माने सल्लागार रितेश पाटील कदम यांचे मार्गदर्शनात लोकाभिमुख कार्य करण्यास सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन नवीन कार्यकारिणीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!