राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाचे कळमनुरी शहराध्यक्ष पदी अहेमद खान पठाण यांची निवड

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
कळमनुरी येथील विश्रामगृहात 7 जानेवारी 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची हिगोली चे जिल्हा अध्यक्ष बी डी बांगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असुन या बैठकीत कळमनुरी तालुक्यात व शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा बुध कमेटी मजबूत करण्यासाठी महत्वाची चर्चा झाली आहे या वेळी कळमनुरी तालुकाध्यक्ष विजय गावंडे महीला तालुकाध्यक्ष रनवीर ताई अजमतुल्ला फारुकी कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी शहराध्यक्ष आवेस पठान हाजी बाबर भाई ,शेर खा पठाण सलीम खान पठाण हाफीज मामु ,सोशल मिडीया शहराध्यक्ष मो यासीन कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कळमनुरी चे महीला शहराध्यक्ष शिलाताई खिल्लारे अल्पसंख्यांक विभागाचे आतीख आतार सोशल मीडिया चे जिल्हाध्यक्ष स बबलु इरफान पठाण यांचा उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष गुठ्ठे मामा यांनी अहेमद पठाण यांची निवड केली आहे