Uncategorized

आमदार नामदेव ससाने यांच्या आश्वासनानंतर चातारी येथील आमरण उपोषणाची सांगता

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

मागील तीन महिन्यापूर्वी घडलेल्या चातारी ग्रामपंचायत जळीत कांडप्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याच्या कारणाने या तपास प्रकरणातील तपास अधिकारी योग्य दिशेने तपास करीत नसल्याने या तपासातील तपास अधिकारी बदलून कार्यक्षम तपास अधिकाऱ्याकडे तपास देऊन यातील खऱ्या आरोपीवर कार्यवाही केल्या जावी या मागणीसाठी चातारी ग्रामपंचायतच्या सदस्या शेख हनीफ बी शेख खाजा मिया यांनी दिनांक सहा जानेवारी रोजी आमरण उपोषण सुरू केले होते या प्रकरणाची माहिती मिळताच उमरखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार नामदेवराव ससाने यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन या प्रकरणातील तपास अधिकारी बदलून मुख्य आरोपीचा शोध घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता झाली यावेळी ऍड अनिल माने गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते बालाजी माने पप्पू शामराव माने राजेश कदम शेख खाजामिया अश्विन माने प्रणव पवार ग्रामसेवक प्रकाश राठोड साहेबराव वाठोरे अरविंद वैद्य सदानंद वंचे वाड नामदेवराव माने सिद्धार्थ वाठोरे शेषेराव माने अजिंक्य माने शिवाजीराव माने यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते …..( चौकट). तपासात दिरंगाई चा आरोप ! मागील कित्येक महिन्यापासून भ्रष्टाचाराच्या आरोपाने गाजत असलेल्या चातारी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत कार्यालयाला अचानकपणे आग लागणे या अग्निकांडानंतर तीन महिन्याचा वर कालावधी उलटून गेला असला तरीही योग्य दिशेने या प्रकरणाचा तपास पूर्ण करून खऱ्या आरोपीचा शोध तपास अधिकाऱ्यांना न घेता येणे यासह विविध प्रश्नावर येथील नागरिकांतून शंका उपस्थित केल्या जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!