लाडके खड्डे बुजवा योजना सुरू करा( आजाद समाज पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी )

शेख मुजाहिद
ससंपादक मो.77983061
संपूर्ण राज्यसह उमरखेड तालुक्यातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे उमरखेड तालुक्यातील खड्डेमय व नादुरुस्त रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, महाराष्ट्र सरकारच्या सुरू असलेली लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडके खड्डे बुजवा योजना सुरू करून त्या योजनेचे उद्घाटन उमरखेड येथे स्थानिक आमदार स्थानिक खासदार स्थानिक विकास पुरुष यांच्या हस्ते करावं अशी मागणी आजाद समाज पार्टी यांच्या वतीने उपविभागीय अभियंता सर्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे दिनांक 7 ऑगस्ट रोजी करण्यात आली, लाडके खड्डे बुजवा या योजनेमुळे खड्डेमय आणि नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती होऊन नागरिकांचा होणारा त्रास कमी होईल अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली, यावेळी आजाद समाज पार्टी चे जिल्हा अध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, गोलू मुनेश्वर सचिन वाहुळे, समाधान राऊत , प्रभू काळबांडे, हर्षदीप काळबांडे कुलदीप खडसे, राहुल हनवते उपस्थित होते