शैक्षणिक

आयआयटी दिल्ली येथेDD ROBOCON 2024 च्या प्रदर्शनात महाराष्ट्राने मारली बाजी

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

आयआयटी दिल्ली तर्फे DD ROBOCON 2024 प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे महाराष्ट्र राज्य येथील विद्यार्थ्यांनी पुस्तक कामगिरी बजावत भारत देशातून दुसरा क्रमांक पटकावून महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
दिनांक 13 व 14 जुलै 2024 रोजी त्यागराज स्टेडियम दिल्ली येथे आयोजित केलेल्या या प्रदर्शनात भारत देशातून विविध राज्यातून 46 कॉलेजनी सहभाग घेतला होता. सदर प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे या महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करून भारत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे ही महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची गोष्ट असून सदर महाविद्यालयाचे एकूण 46 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता या टीम मध्ये उमरखेड येथील स्व. लक्ष्मीकांत कोंडबाराव लोखंडे (BSF) यांचा मुलगा प्रसाद लक्ष्मीकांत लोखंडे ने स्वतः तयार केलेल्या कीपॅड कोड – कम्प्युटर प्रोग्राम वर कमांड ठेवत प्रेझेंटेशन मध्ये यशस्वी कामगिरी बजावली ही उमरखेड तालुक्यासाठी भूषणावह बाब आहे. गुरुजन वर्गाचे योग्य मार्गदर्शन तसेच माझ्या टीम मधील सर्व सहकारी मित्रांचे अथक परिश्रम यामुळे आम्ही यश संपादित करू शकलो असल्याचे सांगून आमच्या सर्व टीमचे भारत देशासाठी या माध्यमातून भरपूर योगदान देण्याचा मानस असल्याचे प्रतिनिधीशी झालेल्या संवादात प्रसाद लक्ष्मीकांत लोखंडे यांनी व्यक्त केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!