सामाजिक

स्व. भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँके तर्फे वृक्षारोपण

आपली माती हीच आपली तिजोरी, वृक्षदान तुमची गुंतवणूक आणि शुध्द हवा हीच आपली व्याजरुपी परतावा.
डॉ. विजय माने

स्व . भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेतर्फे वृक्षारोपण

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड : स्व. पंजाबराव माने यांच्या जयंती निमित्त दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपण करण्याचा संकल्प. करण्यात आला होता त्याच निमित्ताने
स्व. भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँके तर्फे दरवर्षीच वृक्षा रोपनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. यावर्षी गोकुळ नगर येथील हनुमान मंदिर परिसरात कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी कृषी शास्त्रज्ञ डॉ. विजयराव माने प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी डॉ. वि .ना . कदम, देवानंद मोरे, दिलीप भंडारे, अशोक वानखेडे,श्रीधर देवसरकर,सुधाकर वानखेडे, प्राचार्य खान, मुख्याध्यापक सादुळे हे होते
मागील दोन वर्षात ब्राम्हणगाव आणि परजना येथील महादेव टेकडी वर मोठ्या प्रमाणात वृक्षा रोपण करण्यात आले होते. वृक्षांच्या संगोपनात चराऊ जनावरामुळे अडचणी निर्माण होत असल्यामुळे वृक्ष संगोपनासाठी रोपण केलेल्या वृक्षांचे संरक्षण महत्त्वाचे आहे. वृक्ष संगोपण आणि त्याचे संरक्षण लक्षात घेऊन जर लोकांच्या घरांच्या कंपाऊंड मध्ये वृक्ष लागवड कार्यक्रम राबविला तर रोपांची जास्त संख्येने उत्तरजीविता राखल्या जाऊ शकते, यामुळेच निरोगी आयुष्य जगण्यासाठी माणसाला ४० शी नंतर शुध्द प्राणवायू सोबतच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन C ची निर्माण होणारी कमतरता शेवगा, कागदी लिंबू, कडीपत्ता, नारळ, आवळा, सीताफळ या सारख्या झाडांची अंगणात लागवड करून दुहेरी फायदा मिळण्याच्या अनुषंगाने या वर्षी सत्यशोधक शेतकरी संघ आणि राजश्री साहू महाराज स्मारक समिती आणि इतर दान कर्तांनी केलेले वृक्ष दान अवदुंबर वृक्ष संवर्धन समिती आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या तर्फे वृक्ष लागवड करण्याचे श्रमदान करून दरवर्षी वृक्षदान घेऊन मोठ्या प्रमाणात आपल्या मातीला तिजोरी समजून त्यामध्ये वृक्षरुपी भांडवलाची गुत्वणुक ठेव ठेऊन शुध्द हवा आणि प्राणवायू हेच व्याजाचा परतावा समजून भावी पिढीला निरोगी आयुष्य जगण्याची संकल्पना या अनोख्या स्व. भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँके तर्फे निसर्गाची सेवा करण्याचा मानस डॉ. विजयराव माने यांनी व्यक्त केली त्या करिता या बँकेचे अध्यक्ष अशोक शिरफुले यांना मोकळ्या हाताने हरितदान करण्याचे आव्हान डॉ. माने यांनी केले आहे. यावेळी सत्यशोधक शेतकरी संघ कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी यांच्याकडून 15 1 झाडे दान देण्यात आले, राजश्री शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने 150 झाडे, भाऊसाहेब माने गौरव कृती समिती ५ झाडे,प्रा . महेश पानपटे, ५ झाडे ज्ञानेश्वर तवर सर १० झाडे, बि.डी . गावंडे,५ झाडे औदुंबर वृक्ष संवर्धन समितीतर्फे 50 झाडे,अशोक वानखेडे पाच झाडे, कृषी महाविद्यालय कु पटी तर्फे 100 झाडे असे 500 झाडे डॉ. विजय माने व पाहुण्यांच्या हस्ते समर्पित करून कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लागवड करण्यात आले
प्रत्येक वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड (Co2) चे शोषण करून या Co2 चे विघटन करून या मधील C म्हणजेच कर्ब (carban) झाडांमध्ये साठवला जातो व वूर्वरित O2 म्हणजेच आपल्याला निरोगी ठेण्यासाठी लागणारा प्रणवायु वातावरणात उत्सर्जित केला जातो. झाडाच्या संभाव्य ड्रायवेट मध्ये किती प्रमाणात कर्ब साठवल्या गेला हे ठराविक सूत्राच्या आधारे मोजमाप करता येतो व त्या आधारे झाडाने किती कार्बन डायऑक्साइड शोषण केले व त्यातील एका कार्बन मोलूक्युल बरोबर दोन पट ऑक्सिजन हवेत उत्सर्जित केल्या जाते याची अकडेवारी सहज काढता येते, हाच हिशोभ वृक्ष देणगीदारांच्या खात्यात जमा करून मांडण्याचे काम कार्बन क्रेडिट बँक करणार असल्याचे शास्त्रशुध्द विश्लेषण डॉ. विजय माने यांनी या वेळी व्यक्त केले. एक मेट्रिक टन CO2 साठी एक कार्बन क्रेडिट जारी केले जाते, सुमारे 40 वर्षांमध्ये एक झाड समान प्रमाणात CO2 शोषेल असे गृहीत धरल्या जाते. काही देश जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात तर दुसरीकडे भूतान सारखे काही देश असे आहेत ते जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळे याचा परतावा संबंधित देशाला मिळायला हवा याच हेतूने कार्बन क्रेडिट ही संकल्पना उदयास आली आहे. २०१५ साली जपानच्या क्युटो शहरात जगातील १९५ देशांनी पर्यावरणाच्या संवर्धनार्थ एकत्र येत एक करार केला. त्याला क्युटो करार असं संबोधलं जातं. या करारानुसार जगातील कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी काही उपाय करण्याचं ठरलं. कार्बन क्रेडिट हा त्यातीलच एक पर्याय आहे. ग्लोबल वार्मिंगला बळी पडलेल्या पर्यावरणाला मदत करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणे हे कार्बन क्रेडिटचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारने २०२३ पासून कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचे ठरवले आहे.
ज्या देशाचे कार्बनचे उत्सर्जन जास्त आहे अशा देशांनी ज्या देशाचे कार्बन उत्सर्जन कमी आहे किंवा जो देश जास्त कार्बन शोषून घेतो अशा देशांना क्रेडिट म्हणजे पॉईंट्स द्यायचे. हवेतील प्रदूषण करणारी एखादी कंपनीसुद्धा कार्बन शोषून घेणाऱ्या व पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कार्बन क्रेडिट घेऊ शकते. या क्रेडिटची शेतकऱ्यांना ठराविक रक्कम मिळेल आणि प्रदूषण करणाऱ्या कंपनीला जो दंड शासनाला भरावा लागणार आहे त्यातून सुटका मिळेल. त्याचबरोबर जगभरातील कोणतीही कंपनी शेतकऱ्यांकडून कार्बन क्रेडिट घेऊ शकते. भविष्यात याच कार्बन चा व्यवसाय करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळावा या हेतूने कार्बन क्रेडिट बँक स्थापन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी स्वर्गीय पंजाबराव माने यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षी 5000 झाडे लावण्याचा आणि संगोपन वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक शिरफुले संचलन सुनील वानखेडे तर आभार पांडुरंग माने यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!