Uncategorized

काळी (दौ)येथे मेन रस्त्यावर विद्युत प्रवाह चालू असलेला तार खाली पडल्याने गाईचा शॉक लागून मृत्यूशेतकरी मरता मरता वाचला!


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात काळी दौलत येथे पोलीस चौकी जवळ विद्युत प्रवाह चालू असलेला खंब्यावरील तार महावितरण कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे खाली पडल्यामुळे चालू विद्युत प्रवाह मुळे दिनांक 8 6 2025 रोजी बिरबल सुका पवार राहणार काळी (दौ) हा शेतकरी दुपारी 3 च्या सुमारास दोन बैल गाई घरी घेऊन येत असताना विद्युत प्रवाह चालू असलेल्या ताराचा शॉक लागून गाईचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळेस परिस्थितीचे भान ठेवून शेतकऱ्याने समय सूचकता दाखवत दोन बैलाचा व स्वतःचा जीव वाचवला .सामाजिक कार्यकर्ते हंसराज मोरे यांनी घटनेची दखल घेऊन एम एस ई बी ला फोन करून सावध केले त्यामुळे गावातील इतर नागरिकांचे प्राण वाचले व एम एस ई बी चा हलगर्जीपणा याबाबत वरिष्ठांकडे तक्रार सुद्धा केली त्यामुळे शेतकऱ्याचे 25 हजार रुपये गाईचे नुकसान भरपाई भरून देण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!