शहर

उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (15 -हिंगोली) 82 – उमरखेड विधानसभा मतदार संघ यांची आढावा बैठक

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड दिनांक ,11मार्च उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (15 -हिंगोली) 82 – उमरखेड विधानसभा मतदार संघ यांची आढावा बैठक संपन्न झाली नियुक्ति अधिकारी कर्मचारी पासून कामकाजास सुरुवात करावी .काही अडचन असल्यास उपविभागीय अधिकारी/तहसीलदार यांचेशी संपर्क साधा वा. अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांना सोपविलेल्या कामासबंधीचे मा.भारत निवडणूक आयोग, मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसेच मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यवतमाळ मा. निवडणूक निर्णय

अधिकारी (15 हिंगोली) लोकसभा मतदार संघ निर्णय अधिकारी यांची हस्त पुस्तीकेतील संबंधित तरतुदिचे काळजी पूर्वक वाचन करून त्या दिलेल्या निर्देशा प्रमाणे तंतोतंत पालन करून कार्यवाही करावी तसेच वेळोवेळी मा. भारत निवडणूक आयोगाची वेबसाइट www.ecl.gov.in व मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य www.ceo maharashatra.in यावर वेळोवेळी भेट देऊन आपल्या विषयाशी संबंधित आदयवत हैंडबुक ,परिपत्रक ,आदेश डाउनलोड करून त्यानुसार ती कार्यवाही करावी. या आदेश पासून लोकसभा निवडणुकीचे कामकाज पूर्ण होईपर्यंत या कालावधीत कोणीही मुख्यालय सोडुन जाऊ नये व विना परवानगी ने गैरहजर राहु नये सदर कामा मध्ये टाळाटाळ हलगर्जीपणा दीरंगाई होणार नाहीं यांची दक्षता घ्यावी अन्यथा आपल्या विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951चे कलम 134 कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे उपविभागीय अधिकारी डॉ सखाराम मुळे यांनी बैठकी दरम्यान केले आहे. बैठक की ला उपस्थिति तहसीलदार आर यु सुरडकर,गट विकास अधिकारी प्रविण कुमार वानखेड उमरखेड, न.प.मुख्य कार्यकारी अधिकारी महेश जामनोर नायब तहसीलदार वैभव पवार,नायब तहसीलदार एस डी पाईकराव व इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!