आरोग्य

उमरखेड मध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी

शहरात ३० बुथवर ८५ आरोग्य कर्मचाऱ्यानी ६हजार पेक्षा जास्त बालकांना दिले दो बूँद जिंदगिके

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

‌। उमरखेड :- दि ०३ (उमाका) शासनातर्फे सातत्याने पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जात असून उमरखेड शहरात ही मोहिम यशस्वी राबविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली होती
सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर नियमितपणे राबविण्यात येत आहे
जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना नंतर प्रथमच या लसीकरणाचे आयोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले शासनातर्फे सातत्याने पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जात असून शहरात ही मोहिम यशस्वी राबविण्यासाठी राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालया च्या कर्मचाऱ्यांनि योजना यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणारी प्राथमिक तयारी पूर्ण केली असून ही मोहिम यशस्वी करु असा निर्धार दवाखाना प्रशासनातर्फे व्यक्त केला गेला
संपूर्ण देशात १३ जानेवारी २०११ नंतर आज पर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळून आला नाही हे आजवर सातत्यपूर्ण राबविल्या गेलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे यश आहे.
तथापि आजूनही या मोहिमेची अत्यावश्यकता असून आज ०३ मार्च रोजी राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून शहरात विविध ठिकाणी ३० बुथवरून शून्य ते पाच वर्षापर्यंत च्या सहा हजाराच्यावर बालकांना ८५ आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरण मोहीम यशस्वी केली आहे सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी रा प्र उत्तरवार रुग्णालयाचे डॉ रमेश मंडन डॉ शिंदे डॉमोहम्मद अजमतुल्ला डॉ जगताप डॉ जीवने डॉ मुलगीर डॉ स्वाती उपरीकर डॉ कोटगिरवार डॉ वंदे यांचे सह पर्यवेक्षक शितल बोंडगे वि के थोरात एस के कानडे एस बी गिरी आर बी शेंगुळे यांच्यासह आरोग्य कर्मचारी बुथ वरील सर्व कर्मचारी यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.


पुढील पाच दिवस चालणार गृहभेट

०३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ उपक्रम ३० बूथ वर राबवल्यानंतर जे बालक या पोलिओ डोस पासून वंचित राहिले आहेत किंवा जे बुथवर पोहोचू शकले नाही अशांच्या प्रत्येक घरी जाऊन शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोस दिल्या जाईल अशी माहिती रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!