सामाजिक
फिरोजखान पठाण यांचे निधन

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड – स्थानिक अरब कॉलनी येथील रहिवासी फिरोजखान आझादखान पठाण वय ( 46 ) वर्षे यांचे दि. 30 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजताचे सुमारास यवतमाळ येथे कामानिमित्त गेले असताना हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने जागीच निधन झाले. ते भाजपाचे सक्रीय सदस्य होते. भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई वडील, तीन भाऊ, पत्नी चार मुले असा मोठा परिवार आहे. शांत संयमी व्यक्तीमत्व असलेले फिरोज (काका) या नावाने सुपरिचीत होते. त्यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजताचे सुमारास ताजपूरा कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मित मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.