उमरखेड तालुक्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम प्रशासनाने गांभीर्याने करावे..

सकल मराठा समाज उमरखेड च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन केली मागणी
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड :- महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत असताना ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी झाली त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम महाराष्ट्रभर युद्धपातळीवर सुरू केले आहे, उमरखेड तालुक्यामध्ये देखील तहसील प्रशासनाच्या वतीने कुणबी नोंदणी शोधण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे सापडलेल्या नोंदी ह्या शासनाच्या वेबसाईटवर नोंद केली असून सदरील नोंदी हा अपुऱ्याअसल्याचे मत सकल मराठा समाज उमरखेड च्या वतीने व्यक्त होत आहे..
उमरखेड तालुक्यामध्ये एकूण 139 गावे आहेत मात्र नोंदी केवळ 29 गावांमध्ये सापडल्या असल्याने मराठा कुणबी नोंदीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले असून प्रशासनाने या गोष्टीला गांभीर्याने घेऊन मराठा कुणबी नोंदी या परत एकदा तपासून आपल्या वेबसाईटवर जाहीर कराव्या..
तसेच मोडीलिपी भाषेमध्ये जो मजकूर आहे तो देखील मोडीलिपी भाषेच्या तज्ञांना इथे उपलब्ध करून मोडीलिपी मध्ये काही नोंदी असतील तर त्याही शोधण्याचे काम प्रशासनाने करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे..
यावेळी सकल मराठा समाजाचे किशोर वानखेडे, विजय हरडपकर स्वप्निल कनवाळे गणराज कदम प्रकाश जाधव राम कदम अजित नलावडे प्रमोद राणे आत्माराम सुरोशे प्रवीण सूर्यवंशी विकास वानखेडे संतोष चव्हाण गुणवंत देशमुख विठ्ठलराव वानखेडे पांडुरंग वानखेडे अमर सुरोशे प्रकाश कदम ओम सूर्यवंशी किसन सूर्यवंशी राजेश कदम यासह मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव निवेदन देण्यासाठी उपस्थित होते..
चौकट :
उमरखेड तालुक्यातील काही गावांमध्ये सद्यस्थितीला बऱ्याच समाज बांधवांकडे कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध आहे मात्र सध्या शासनाने जा नोंदी जाहीर केल्या त्यामध्ये प्रमाणपत्र असणाऱ्याच समाजाच्या लोकांच्या कुतलबुकाच्या नोंदी नसल्याचे निदर्शनात येत आहे त्यावरून प्रशासनाच्या कुणबी नोंद शोध मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे….
स्वप्निल कनवाळे, समन्वयक सकल मराठा समाज उमरखेड